Skip to main content

मुक्तक

ओटीतले ब्लाऊजपीस...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 12/01/2018 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
- काकी, पुन्हा सुरू झाले बघ.. - आता काय... थांब बघते.. अरे देवा… तिकडे सुखी कुटुंब च्या ग्रुपवर पुन्हा एकदा मेसेज आला होता.. आशय काहीसा असा.. कोकणात हाणामारी, मोर्चे हे प्रकार फार होत नाहीत, कारण, लिंबू पुरतं.. आता यावर हसावं की रडावं.. तर विनोद म्हणून हसावं. पण किती वेळा? एकच विनोद तीन माणसांनी सलग तिनदा टाकला की हसू येण्याऐवजी संतापच येतो हल्ली. मग मला पर्सनलवर मेसेज करणाऱ्या पुतण्याने सुखी कुटुंब वर मेसेज टाकला.. “संक्रांत येतेय. तिळगुळाचे मेसेज सुरू करायचे का...” मी त्याला प्रतिसाद दिला, थांब जरा.

गूढ अंधारातील जग -६

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 12/01/2018 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -६ पाणबुडीचा शोध जर पाणबुडी लपून छपून हल्ला करण्यासाठी इतकी प्रसिद्ध आहे आणी पाणबुडी एवढे महत्त्वाचे शस्त्र आहे तर ते आपल्या शत्रूकडे पण असणारच. मग ते शोधणे पण तितकेच आवश्यक आहे. यासाठी कोण कोणते उपाय केले जातात ते आपण पाहू. मुख्यतः चार साधने वापरली जातात. १) पाणबुडीविरोधी जहाज २) विमान/ हेलिकॉप्टर ३) पाणबुडीविरोधी पाणबुडी ४) उपग्रह पाणबुडीच्या शोधासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जाते त्याचे मुख्य दोन प्रकार असे आहेत ते असे. A)ध्वनीच्या साहाय्याने ACOUSTIC.

लेखकांच्या बायकोचे नाव.....

लेखक ss_sameer यांनी शनिवार, 06/01/2018 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक लेखक, कसे तरी कागद काळे करण्याचा माझा दिनक्रम. अन तू माझी बायको, कसे तरी नवऱ्याला कामाला लावण्याचा तुझा दिनक्रम. कोणत्याही विषयांस आमच्या विचारांच्या चौकटीत बसवून त्याची लांबलचक तार बनविण्याचा आमचा उद्योग निरंतर सुरूच असतो. या सगळ्या प्रकारांना कागदाचे असंख्य प्रकार कंटाळले, शेकडो लेखण्या त्यांचे आयुष्य झिजवून गेल्या. दौतीच्या कित्येक बाटल्या रिकाम्या झाल्या, फाउंटन पेनच्या निबांच्या टोकांचे रंगाऱ्याचे ब्रश झालेत. पण आमचे उद्योग शमण्याचे नाव घेत नाहीत. सहस्रावधी विचार कागदावर उमटवून तो कागद स्वतःच्या कवेत सामावून घेणाऱ्या कित्येक कचरा पेट्यांनी अजीर्ण होऊन उलट्या केल्यात.

इतिहासाचं वर्तमान

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 04/01/2018 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वज्रलेप इतिहासावर उभा आश्वासक वर्तमान? निळ्या-भगव्या दगडांचे भागधेय सेम भगव्या-निळ्या डोक्यांवर बिनचूक नेम खळ्ळ खटॅक- खळ्ळ खटॅक : किडुकमिडुक चक्काचूर भक्क पिवळा आगडोंब : काळा धूर सर्वदूर १४४ कलमाच्या निगराणीला खाकी बंदूकदस्त्यांचे कुंपण पांढर्‍या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय? सांभाळा, खाली आरपार सडकं वर्तमान वाहतंय
काव्यरस

अ क्लोथलाईन.

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 01/01/2018 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर.. निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा.. नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट.. आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट, भोकाभोकाचं बनियन.. टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट.. कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट.. चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक.. काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे, त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे दोरीवर वाळत घातलेले कपडे खूप काही सांगून जातात, घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
काव्यरस

एक पत्र

लेखक मिडास यांनी रविवार, 31/12/2017 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वैष्णवी, आज चुकून पहाटे डोळा उघडला. बाहेर मस्त थंडगार वारा सुटला होता. कशी कोण जाणे पण तुझी आठवण आली मला. थंड हवेत तुझा चेहरा एकदम वेगळाच दिसतो. डोळ्यातून हसणं तू कुठून शिकलीस माहित नाही, पण तुझे डोळे बघितले कि खूप उबदार वाटतं मला.

शस्त्रास्त्रांचा बाजार- २

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 30/12/2017 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
शस्त्रास्त्रांचा बाजार- २ अनंताने राहुलला जायच्या अगोदर विचारले कि तुझा स्टॅनफोर्डचा प्रवेश कसा झाला आणि पुढे काय करायचा विचार आहे? त्यावर राहुल हसून म्हणाला आवश्यक त्या ठिकाणी आपले संबंध असले(right contacts in right place) कि सर्व जमते. माझे एम एस झाले कि तेथेच माझी नोकरी ठरलेली आहे त्यानंतर व्हिसा आणि ग्रीन कार्ड. अनंत म्हणाला, 'एवढं सगळं पुढचं कसं ठरवता येईल?" त्यावर राहुल त्याला म्हणाला, "हे बघ तू साधा सरळ आहेस. तुला म्हणून सांगतो आहे. बाहेर कुठेही बोलू नकोस आणि बोललास तर मी कानावर हात ठेवेन.

हुच्चभ्रू एलिट शिरेल्स

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 30/12/2017 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !! बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत. माझी उडी ज्याच्या मध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं अश्या फालतू मराठी शिरेल पासून फार तर हिंदी पर्यंतच किंवा जास्तीतजास्त हुच्च् म्हणजे डब केलेली एखादी ल्युसी. आता आमची अभिरुचीच अशी त्याला काय करणार? आमचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे वाघिणीचे दूध. आम्ही ते भीत भीतच पिलेलो त्यामुळे च्यामारी काय बोलतोय काय बी कळंना अशी अवस्था. हरी पुत्तरचं नाव ऐकलेलं ते सिनेमाच्या संदर्भात.

म्हातारपणाआधीची प्रतिज्ञा

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 30/12/2017 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
जेंव्हा कधी दुखणी मागे लागतील तेंव्हा लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पीडणार नाही त्यांची त्यांना कामं आहेत, माझी मी वेळेवर औषधं घेईन किती वेळा ‘जावं’ लागलं, चर्चा करणार नाही माझ्या दुखण्याची काळजी घेणारे आहेतच त्यांचा मान ठेवेन, पण भार होणार नाही गरज असेल तेंव्हा हक्काने मदत मागेन पण नावडता म्हातारा होणार नाही!

शस्त्रास्त्रांचा बाजार

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 28/12/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
शस्त्रास्त्रांचा बाजार अनंतकृष्णन हा एक तमिळनाडू च्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील छोट्याशा गावात प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्माला आलेला हुशार तरुण. वडिलांच्या शाळेतच बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले आणि बारावीला उत्तम गुण मिळवल्यामुळे त्याला तिरुनेलवेलीच्या श्री तिरुवल्लुवर सरकारी अभियांत्रिकी विद्यालयात प्रवेश मिळाला. घराजवळच्या महाविद्यालयातूनच अभियंता बनलेल्या अनंताने GATE दिली आणि त्यात त्याचे गुण चांगले आले. या गुणांवर चांगल्या महाविद्यालयात एम टेक ला प्रवेश घ्यावा या विचारात असताना DRDO (संरक्षण संशीधन आणि विकास संघटन) येथील नोकरीची जाहिरात आली.