Skip to main content

मुक्तक

माणूस प्रगत झालाय?

लेखक फुंटी यांनी रविवार, 11/02/2018 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे माणूस प्रगत झालाय व्हेजवाल्याला शेजारी म्हणून नॉनव्हेजखाणारा नको आमच्या सणात त्यांची लुडबुड नको विविधता में एकता खरं पण अशी ?? नोकरीत 'ते'नको आमच्या बँकेत आमचेच जातवाले जात धर्माच्या लेबलला प्राधान्य देणारा आमचा देश सर्वात पुढे ... गावात ठीक होत पण शहर तरी सुधारलेली ना आज तिथेच उंचच उंच टॉवर आहेत जाती धर्मांचे... माणुसकी गाडली गेलीय बहुधा पाया खणताना...

गूढ अंधारातील जग -८

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 09/02/2018 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -८ खोल समुद्रातील जीव सृष्टी आपण समुद्रात खोल गेलो कि दर १० मीटरला १ बार(१४ psi pound per square inch) या दराने दाब वाढत जातो. तर साधारण १००० मीटर खोलीवर हा दाब १४००० psi. तुमच्या कारचे टायर प्रेशर ३० psi च्या आसपास असते. हा दाब म्हणजे एका चौरस इंचावर ८ टन किन्वा तुमच्या डोक्यावर १०० हत्ती उभे केले तर होईल तितका दाब आहे. महासागरातील सर्वात खोल मरियाना घळीची खोली १०००० मीटर असली तरी महासागराची सरासरी खोली ४००० मीटर असते. आणि बरेचसे जीव हे १००० मीटर पेक्षा खोल जात नाहीत. मग एवढा दाब काही सजीव कसे सहन करतात.

गूढ अंधारातील जग -७

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 03/02/2018 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -७ पाणबुडीचा शोध--ध्वनीच्या साहाय्याने (ACOUSTIC). मागील भागात आपण पाहिले कि पाणबुडीचा शोध ध्वनिव्यतिरिक्त इतर मार्गानी कसा केला जातो. अर्थात ते सर्व "इतर" उपाय आहेत पण पाणबुडीचा शोध प्रामुख्याने ध्वनीच्या साहाय्याने केला जातो यात ध्वनीचा उपयोग दोन तर्हेने केला जातो. १) PASSIVE SONAR (क्रियाहीन) फक्त येणारा ध्वनी ऐकणे -- २) ACTIVE SONAR (सक्रिय) आपण ध्वनी पाठवणे आणि येणार प्रतिध्वनी ऐकणे. दोन्ही तर्हेच्या सोनार मध्ये ऐकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संवेदकाला हायड्रोफोन म्हटले जाते म्हणजेच पाण्यात ऐकण्याचे साधन.

डू-आयडीज् खूप दिसतात इथे, परतुनी येती "नाना"विध रूपे

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 03/02/2018 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
डू-आयडीज् खूप दिसतात इथे परतुनी येती "नाना"विध रूपे स्कोअर सेटल होतात इथे ट्रोलिंग जणू हक्कच असे कंपू करून पीडतात इथे पिंक टाकणे हेच ध्येय असे अजेंडा घेऊन येतात इथे काडी सारून नामानिराळे कसे विवादास्पद विषय प्रिय असे धागा पेटवून मजा बघती कसे अनेकानेक आयडीज् तयार असे एक उडाला तरी चिंता नसे मतामतांचा गलबला इथे मज जैसे सज्जन थोडेच असे

हे चैतन्याच्या विराटा

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 02/02/2018 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
शांत निवांत समुद्र अस्ताला जाणारा नारायण येऊ घातलेल्या भरतीची लाटांशी अस्पष्ट कुजबुज आताशा भान हरपत नाही आठवते अक्राळविक्राळ वादळ सुरुची बाग पिळवटून काढणारं उन्मळून टाकणारं रौद्राच अफाट दर्शन खरं काय म्हणावं मन रिझवणारी संध्याकाळ की मन उध्वस्त करणारी कातरवेळ सुख दुःखाच्या या खेळाचा आयोजक कोण हे चैतन्याच्या विराटा, मला सामावून घे!!

बजेट -- एवढं काय त्यात!!

लेखक चिनार यांनी गुरुवार, 01/02/2018 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आईची शप्पथ घेऊन सांगतो मला बजेट मधलं काहीही कळत नाही. पण आसपासचे लोकं "बजेट आहे,बजेट आहे" म्हणून अशी काही वातावरण निर्मिती करतात की मी उगाचच एक्ससाईट होऊन त्याची वाट बघायला लागतो. अर्थमंत्र्यांचं दोन- तीन तासांचं भाषण ऐकल्यावर "आपल्याला ह्यातलं काय कळलं?" असा प्रश्न एकांतात मी स्वत:ला नेहमीच विचारतो. आता हा प्रश्न क्षणिक असला तरी "आपल्याला नेमका काय फरक पडला?" हा प्रश्न तर वर्षभर सतावत असतो. बजेटमध्ये अमुक अमुक गोष्टीत स्वस्त झाल्या असं जाहीर करतात. त्या खरंच झाल्यात का हे बघायला मी मुद्दामहून कधीही बाजारात जात नाही.

मनाचं प्लॉटिंग

लेखक फुंटी यांनी सोमवार, 22/01/2018 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनात आहेत असंख्य Non Attached प्लॉटस गुंतत नाही मी सहसा कशात प्लॉटिंग करून ठेवलंय मी काटेरी तारेच्या कुंपणाने बंदीस्त लहान होतो तेव्हाही होतेच हे प्लॉट पण त्याला असायच काटेरी ठेवाच कुंपण त्यावर काटे असले तरी फुलही फुलायची अधूनमधून आता मात्र मनाचे प्लॉट रुक्ष व्यवहारांच्या काटेरी तारेने वेढलेले हल्ली कुंपणावर वाढवलेला वेल दिसायला सुंदर दिसतो मात्र त्याखालीअसतेच व्यवहारांचा पहारा कुणाशीही मोकळंढाकळ बोलावं असं नाही राहिलं अंगण प्रशस्त गेटमधून कुणी आलं बोलायला तरच बोलावं हेच झालंय आमचं हाय स्टॅंडर्ड

(भिती तुझ्याउरी पण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 17/01/2018 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही. या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा? धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती. या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा? फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला . मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा? सोडून नेक वाट,चळते बुद्धी​ जराशी. मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा? जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे. नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा! आता मौनवदनी, सोडून देतं आहे. विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा! मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे. हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा. थांबवू कसातरी मग मी?

गतिरोधक एक चिंतनिका

लेखक ss_sameer यांनी रविवार, 14/01/2018 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
गतिरोधकांचा शोध हा एक क्रांतिकारी शोध मानला जावा हा अमुचा हट्ट आहे. क्रांतीची फळे ही कायम गोडच असतात असे नव्हे परंतु एखाद्या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पेटून उठत असेल किंवा क्रांतीज्योतीचे रूपांतर क्रांती वणव्यात होत असेल तर मात्र त्या क्रांतीची गळचेपी करणे साठी प्रतिक्रांती(च) घडावी लागते हा अमुचा(च) अनुभव आहे. भार्येच्या आर्जवपूर्ण (धमकीयुक्त) संदेशास कानाडोळा करून दूरचित्रवाणी वरील चेंडूच्या लाथाळ्या पाहण्यास प्राधान्य देणे ही क्रांतीची ठिणगी आणि ततपश्चात जे घडते ती प्रतिक्रांती. अर्थात हा वरील अनुभव अनेकांनी अनुभवला असेलच.