Skip to main content

मुक्तक

एका रम्य पहाटे

लेखक मालविका यांनी सोमवार, 23/09/2019 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
एका रम्य पहाटे फेब्रुवारी महिन्यात काही कामानिमित्त पुण्याला जाणे झाले. चिपळूण पुणे अंतर २०० किमी आहे. एकदा दिवसात पुण्यात जाऊन परत यायचं असा प्लॅन ठरला. त्यामुळे पहाटे ४ला चिपळूणहुन निघालो. माझे दोन भाऊ विवेक दादा आणि सुमंता, मी आणि श्रीनिवास असे चौघे जण प्रवासात एकत्र होतो. (त्यावेळी कुंभार्ली घाटाची अवस्था बरी होती) पण पाटण ते उंब्रज रस्ता मात्र वाईट याच अवस्थेत होता. त्यामुळे सुमंता आणि विवेकदादाने एका नवीन रस्त्याने जाऊया म्हणून सुचवले. 'आम्हाला काय ?

आणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो.

लेखक राजे १०७ यांनी बुधवार, 18/09/2019 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
नव्वद ब्याण्णव असं काही तरी साल असेल. मला पुण्याला भेट द्यायला फार आवडायचं. लक्ष्मी रोड वर नामांकित ज्योतिषांकडे भविष्य पाहणे, तुळशीबागेत नुसतं भटकणं, सारसबाग, पर्वती, संभाजी उद्यान वेळ मिळेल तिकडे भटकणं आणि खादाडी करणं हा सोलो प्रोग्राम असायचा. पिएमटीने कमी पण पायी खूप फिरायचो. मला नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू पहिल्या पासून खूप आवडायच्या. लहान रेडिओ, घड्याळं, विजेऱ्या अशा वस्तूंच्या शोधात मी कॅम्प मध्ये सायंकाळी भेट द्यायचो. अरोरा टॉवर परिसरात सायंकाळी रस्त्यावर असे विक्रेते स्वस्तात अशा गोष्टी विकायचे. आजकाल कुठेही चायना इलेक्ट्रॉनिक व इलक्ट्रीक वस्तू मिळतात.

दुपार

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 18/09/2019 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या पैंजनाची गाज, त्यात रेंगाळे दुपार, विसावल्या सतारीची जणू छेडियली तार, तिच्या कपाळी जी बट त्याला कुंकवाची तीट, लाल रेशमी लडीची, तिच्या गालाशी लगट तिच्या पाठीची पन्हाळ त्यात घामाचा पाझर, तिच्या नाजूक कटीला, शोभे नाजूकसा भार.. तिच्या बाहूंचा मांडव, लावी मदनाला वेड, तिची महकती काया तिचे ओझे अवघड.. सुस्त दुपारच्या वेळी, ती येते का सामोरी, मन हलते हलते, त्याला सांभाळावे कोणी? - शैलेंद्र.
काव्यरस

माझा कुकिंग एक्सपिरिमेंट

लेखक मृणमय यांनी सोमवार, 16/09/2019 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी आरती, आता कुणाची विचारू नका :) हा माझा लिहिण्याचा पहिला प्रयत्न. आमच्याकडे तसे कुणी लिहीत नाही, फक्त बोलतात आणि ते हि खूप जोरात. तर आज खास लिहिण्याचे कारण असे कि ऑफिस मध्ये काही फारसे काम नाही. ( ऑफिस मध्ये कुणालाही मराठी येत नाही ह्याचा हा फायदा) आता असा अलभ्य लाभ वर्षातू कधी तरीच होतो आणि जर हे दान पदरात नाही पाडून घेतलं तर आयुष्यात काय मिळवलं? ( आता साडी आणि पदर नसला तरी भाव महत्वाचा). तर मी आज माझ्या कुकिंग एक्सपिरिमेंट बद्दल लिहिणार आहे. सध्या युट्युब वर कूकिंग चे चॅनेल खूप जोरात चालू आहेत.

धन वर्षा...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 14/09/2019 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
एका मऊशार दुपट्यात लपेटलेला तो एवढासा जीव निगुतीने सांभाळत ती गाडीतून उतरली आणि थेट डॉक्टरसमोर जाऊन तिने दुपटं अलगद उघडलं. आतला जीव मलूल पडला होता. तळव्यावर जेमतेम मावेल एवढं लहानसं, तपकिरी रंगाचं कोणतीच हालचाल न करणारं आणि जिवंतपणाचं कोणतच लक्षण दिसत नसलेलं कासव टेबलावर डॉक्टरांच्या समोर पडलं होतं, आणि चिंतातुर नजरेनं ती डॉक्टरांकडे पाहात उभीच होती. डॉक्टरांनी तो जीव उचलून हातात घेतला, उलटा केल्याबरोबर त्याची बाहेर आलेली मान उलट्या दिशेने कलंडली. मग त्यांनी त्याच्या पायाला स्पर्श केला. निर्जीवपणे तो लोंबकळत होता. डॉक्टरांनी निराशेने नकारार्थी मान हलविली. ते कासव मेलं होतं.

भविष्य

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 12/09/2019 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्रातले रोजचे राशिभविष्य सकाळी पहिला चहा घेण्याआधी वाचून घ्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. तसे केल्याने त्या दिवसाच्या भविष्यानुसार वागण्याची आखणी करता येते. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे, भविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर वर्तमानपत्रांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्य वर्तविण्याच्या विद्या किंवा शास्त्रावर आपला विश्वास बसतो, आणि दुसरे म्हणजे, आपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने व कोणा तरी शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली घडणार असल्याने त्या वागण्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतात, त्याचे वाईट वाटत नाही.

सहजच

लेखक चंद्र.शेखर यांनी गुरुवार, 12/09/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुला भेटण्याची ओढ मला अनंत काळापासून लागून राहीलेली आहे ... निसर्गात तू असतोस म्हणे म्हणून मग तुझ्या ओढीने मी पर्वतांत ट्रेकिंग ला जातो तुझा रखरखीतपणा देखील अंगावर झेलतो, मातीच्या सुगंधानं हरखून जातो जंगलात-शेतात जातो, नदीत डुंबतो, पाण्याची तरलता, प्रवाह, ओढ मी माझ्यात साठवतो, प्रसन्न वाटतं तिथे एखादी मोठी शीळा बघून तिच्या आडोशाला मी शरीर मोकळं करतो छोट्या सुबक दगडांना मात्र मी सोबत घेवून येतो, शेंदूर फासतो आणि त्यांच्यासमोर मन मोकळं करतो तु सर्वव्यापी आहेस मी मुलांना हेच त्यांच्या लहानपणापासून शिकवतो पण शरीरधर्माच्या त्या दिवसांत विटाळ होईल म्हणून मी मंदिराच्या गाभाऱ्यात, देवघराजवळ जात नाही

बिगरी ते डिगरी‘...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 07/09/2019 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर, आपल्या बोटाला धरून बिगरीपासून डिगरीपर्यंतचा प्रवास घडवून आणणाऱ्या गुरुजनांच्या अनेक आठवणी काल मनात अचानक, आणि नकळतही, उचंबळून आल्या. अशा आठवणींना वयाचा क्रम नसतो.

नाचणाऱ्या गाणाऱ्यांचा देश

लेखक सर टोबी यांनी शनिवार, 07/09/2019 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक समाज म्हणून आपण बरीच प्रगती केली आहे. मुलांवर संस्कार करताना छडी लगे छमछम असा सब घोडे बारटक्के पासून सुरु झालेला प्रवास आता मुलांचा कल बघून ऐच्छिक विषय शिकविण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. आता मुलांना 'मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न विचारणे शिष्टसंम्मत राहिलेला नाही. मुलांना पॉकेटमनी देणे थोडेफार सर्वमान्य झाले असावे. 'आम्ही म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास केला, जुनी पुस्तकं वापरली, सायकलवर शाळा कॉलेजचे शिक्षण घेतले' असे सुनावणे बंद झाले असावे.

शं नो वरुण: । एक अनावृत्त पत्र

लेखक मायमराठी यांनी गुरुवार, 05/09/2019 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
शं नो वरुण: । प्रिय विश्वव्यापीजनमुदितेश्वरा, तुझ्या सुयोग्य असा मायना नाही शिकलो. उगाच औपचारिकता कशाला? जन्मापासून नातं आहे तुझ्याशी. आई सांगते की कंबरेएवढ्या पाण्यातून मामा डबा घेऊन यायचा तिला माझ्या वेळेला. फक्त मीच कशाला? या वसुंधरेवर कोणाच्या जन्माला तू साक्षी नव्हतास? पंचमहाभूतांच्या खेळांत भाग घ्यायला खूप आधीपासूनच तू भूत होऊन तयार होतास, तेव्हापासून आजतागायत तसाच आहेस. मी तेव्हा नव्हतो असं तुझ्या मनांत तरी कसं आलं? जेव्हा सगळी भूतं रचली जात होती तेच तर आमच्या सर्वांचे बेगडी जन्माचे क्षण.