Skip to main content

मुक्तक

शं नो वरुण: । एक अनावृत्त पत्र

लेखक मायमराठी यांनी गुरुवार, 05/09/2019 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
शं नो वरुण: । प्रिय विश्वव्यापीजनमुदितेश्वरा, तुझ्या सुयोग्य असा मायना नाही शिकलो. उगाच औपचारिकता कशाला? जन्मापासून नातं आहे तुझ्याशी. आई सांगते की कंबरेएवढ्या पाण्यातून मामा डबा घेऊन यायचा तिला माझ्या वेळेला. फक्त मीच कशाला? या वसुंधरेवर कोणाच्या जन्माला तू साक्षी नव्हतास? पंचमहाभूतांच्या खेळांत भाग घ्यायला खूप आधीपासूनच तू भूत होऊन तयार होतास, तेव्हापासून आजतागायत तसाच आहेस. मी तेव्हा नव्हतो असं तुझ्या मनांत तरी कसं आलं? जेव्हा सगळी भूतं रचली जात होती तेच तर आमच्या सर्वांचे बेगडी जन्माचे क्षण.

दोरीवरचे कपडे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/09/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोरीवरचे कपडे दोरीवर कपडे कसेही वाळत असतात कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात? शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो (यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.) पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे साडी घालून घडी बसते वाळत वा-याने तिचा पदर असतो हालत किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय त्यात बाई घातली अ

एक ऐकलेली कार्पोरेट कथा..

लेखक चिनार यांनी गुरुवार, 29/08/2019 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट कंपनी होती. सगळं कसं छान, सुसज्ज,चकचकीत,स्वच्छ वातावरण. अगदी "परिंदा भी पर ना मार सके" अशी सुरक्षा व्यवस्था. हजारो इंजिनीयर्स, शेकडो मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, व्हाईस प्रेसिडंट असे सगळे हुशार लोकं तिथं काम करायचे. अर्थात काम करताना काही ना काही समस्या रोजच यायच्या. पण सगळेच प्रोफेशनल असल्यामुळे, स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या सोडवायचे. मग त्याचं कोडकौतुक,बक्षिस,पगारवाढ,बढती असं चक्र नेहमीच सुरु असायचं. पण एके दिवशी अघटीत घडले. नेहमीच्या समस्या बाजूलाच राहिल्या अन एक भलतीच समस्या उद्भवली. कंपनीचे सुरक्षाचक्र भेदून एक माकड कंपनीत शिरले.

पुस्तक

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 29/08/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच माझ्या मनात एक विचार आला. पुस्तक लिहायचा. या पुस्तकाची संकल्पना मी तुम्हाला सांगणार नाही. पण हे नक्कीच वेगळ्या धाटणीचे पुस्तक ठरावे असा माझा प्रयत्न होता. कधीकधी पुस्तकाचे नावच त्याचा गाभा उलगडून दाखविते. म्हणून पुस्तकातील पहिल्या लेखाचे पहिले अक्षर लिहिण्याआधी मी पुस्तकाचे नाव निश्चित केले... ‘युद्ध आमुचे सुरू!’... ज्या डायरीत माझे हे संकल्पित पुस्तक हस्तलिखित स्वरूपात संपन्न होणार आहे, त्या डायरीच्या पहिल्या पानावर मी झोकदार अक्षरात हा मथळा लिहून टाकला आहे. ‘युद्ध आमुचे सुरू!’ ...

सहजच..

लेखक प्रमोद पानसे यांनी शनिवार, 24/08/2019 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.मग लगेच एखाद्या म्युझिक ॲप मधुन ते शोधुन ऐकतोही आपण.पण तेवढी मजा नाही येत.एक फक्त इच्छा झालीये आणी ती पुर्ण करणं लगेच शक्य आहे म्हणून असेल कदाचित् पण नाही येत मजा .आणी मन कोरडंच रहातं. मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं . एखादा चेहरा रोज आठवत असतो .कधीकाळी रोज तो बघण्याची ओढ असणारा ,आणी ठराविक वेळी रोज बघायला मिळणारा .पण त्या वेळेची

इंद्रधनुष्य

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 23/08/2019 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनुष्य लहान मुलांचं जग काही वेगळच असत. आपल्याला सुचणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी या मुलाना सहज सुचतात आणि आपल्याला नवल वाटत राहत. गणपतिला आम्ही आमच्या गावाला वेळणेश्वरला गेलो होतो. ईशानला माझ्या मुलाला इथे एक नवीन अन्वी नावाची मैत्रीण मिळाली. आम्ही बाहेर फिरायला जाताना ईशान बरोबरच अन्वीला देखील घेतली. अतिशय बडबड करणारी हि गोड मुलगी ४ वर्षाची आहे. येताना हलकीशी पावसाची सर पडली आणि लगेचच लख्ख ऊनदेखील पडल. सहजच वळून बघितलं तर पूर्ण इंद्रधनुष्य पडलं होतं. अगदी पूर्ण १८० अंशात. खूपच सुंदर देखावा होता तो. मुद्दाम गाडी थांबवून मुलांना दाखवलं ते सुंदर दृश्य. मुलं देखील खूप खुश होती.

स्वरराधा

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 23/08/2019 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
भैरव वा भटियार पहाट फुलवत येती, स्पर्श जणू कान्ह्याचे राधेला उठवुन जाती. ठाऊक तिला सारंग माध्यान्ही झुलवत येतो, "गंध" न त्यास स्वत:चा तरि वृंदावनी घमघमतो. यमन असा कान्ह्याचा यमुनेचे श्यामल पाणी. निनाद गोघंटांचा सांज करी कल्याणी. मालकंस वा जोग, अमृत बरसे गात्री. कान्ह्याच्या ओठी वेणू तिच्याचसाठी रात्री. कणकणात भिनली आहे मल्हाराची आस, मेघ पेटवून जातो मयूरपंखी प्यास. पण सूर भैरवीचा का राधेला माहीत नाही? युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..
काव्यरस

काल्पनिका

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 20/08/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पक : एक काल्पनिका. भगवान ब्रह्मदेवास एकदा घाईघाईने पृथ्वीवर जायचे होते. एका पुण्यात्म्याच्या महानिर्वाणाचा मुहूर्त जवळ येत होता, त्याला सन्मानाने स्वर्गलोकी आणण्याचे काम इंद्रदेवाने ब्रह्मावर सोपविले होते. सारी तयारी करून ब्रह्मदेव विमानतळावर आले. पुष्पक तेथे सज्जच होते. ब्रह्मदेव विमानात बसले आणि सारथ्याने पुष्पकाची आरंभकळ दाबली. पण दुर्दैव. विमान सुरू झालेच नाही. गरूडही गप्प उभा होता. चालकाने पुन्हा प्रयत्न केला. तोही फसला. खूप वेळा प्रयत्न करूनही पुष्पक स्टार्ट होत नसल्याने वैमानिक हताश झाला. ब्रह्मदेवही काळजात पडले..

सेक्रेड गेम्स २

लेखक किसन शिंदे यांनी रविवार, 18/08/2019 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल. या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 17/08/2019 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता.