नाराजी का `राज'
-----
अभूतपूर्व रोषणाईने "कृष्णकुंज' गजबजून गेले होते. संपूर्ण परिसराला "मनसे'च्या झेंड्याच्या पताका लागल्या होत्या. सगळीकडे फटाके वाजत होते. जल्लोष सुरू होता. महाराष्ट्रातून, देशातून, जगातून आलेले हजारो कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत होते. आज खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, "मनसे'च्या कर्तव्यनिष्ठतेचा विजय झाला होता. मराठी राष्ट्रपतींनी खास अध्यादेश काढून महाराष्ट्रातून सर्व बिहारींना, उत्तर भारतीयांना, मध्य प्रदेशींना, गुजरातींना, बंगालींना, पंजाबींना हाकलून देण्याचा आदेश काढला होता.