मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

मिपा ओळख २

चेतन ·
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

बाई मी "दळण' कांडिते!

आपला अभिजित ·
----------- भडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत नेहमीप्रमाणे कामात दंग होती. मधली एक गिरणी फारच अवाढव्य होती. एखाद्या ऑटोमोबाईल कारखान्यात शोभावी, अशी. या गिरणीवर एकता कपूर स्वतः काम करत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं. या भल्यामोठ्या आवारात शेजारीच रांगेत, ठराविक अंतरावर पंधरा-वीस गिरण्या मांडल्या होत्या. त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या. या एकताच्या "डमी'.

विचारचक्र

सहज ·
मागल्या आठवड्याची गोष्ट. आता दिवाळी, खरेदी, आवराआवर, गाठीभेटी अश्या वातावरणात घडू नये अशी एखादी तरी घटना घडतेच. व ती घडली. ओळखीच्या एका व्यक्तिचा अपघात. ही व्यक्ती खूप जवळची अशी नाही पण जे घडले ते काही डोक्यातुन जात नाही. म्हणुन इथे उतरवण्याचा खटाटोप. ही व्यक्ती तरुण. नुकतेच ३ महीन्यापुर्वी लग्न झालेले. पेशाने डॉक्टर. अपघात झाला, दोन्ही पाय गेले. अपघात झाला तरी कसा? समोरुन रेल्वे येतीय हे दिसतेय तरी रुळ ओलांडून जायची घाई. असे अनेकदा केले असणार आयुष्यात. नेमकी वेळ यायची होती. झालं पाय अडखळून पडला; वेळेत उठू शकला नाही.

दिवाळीतले चमत्कार-४

आपला अभिजित ·
राणेंची लगीनघाई ---------- सकाळी सकाळी निवांत "प्रहार' वाचत बसलेल्या नारायण राणेंना नीलिमाताईंनी हलवलं. ""अहो उठल्या उठल्या पेपर काय वाचत बसलाय? चला, अंघोळ उरकून घ्या!'' ""अगं, आज दिवाळीचा पहिला दिवस. कॉंग्रेसमध्ये आल्यावर माझ्या मुख्यमंत्रिपदाची सुद्धा ही पहिली दिवाळी. आणि तू अंघोळ वगैरे काय म्हणतेस? "अभ्यंगस्नान' म्हणावं! आणि "पेपर' काय म्हणतेस? "प्रहार' म्हणावं! काही फरक आहे की नाही?'' राणे जरासे चिडक्‍या स्वरात म्हणाले. ""अहो, इथपर्यंत पोचण्याआधी तुम्ही कुणाकुणाच्या नावानं अंघोळ करत होता ना, म्हणून तेच डोक्‍यात बसलंय.'' ""असो. चला, आटपा लवकर. छान सुगंधी उटणं लावते. गरम पाणी काढून ठेवलंय.

दिवाळीतले चमत्कार-३

आपला अभिजित ·
ओवाळिते भाऊराया! ------ तासगावातल्या आपल्या घरी दिवाळीसाठी गेलेल्या आर. आर. पाटलांना तिथेही चैन नव्हताच. आपल्या अनुपस्थितीत गावात कुठे काही गैरप्रकार सुरू झालेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी गावातून फेरफटका मारला. आबा गावात असले, की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात "तीन पत्ती' खेळायला सुद्धा बंदी होती. गावातले गुत्ते बित्ते तर केव्हाच बंद झाले होते. एवढंच नव्हे, तर आबांसमोर तंबाखू खायचीही कुणाची टाप नव्हती. गृहमंत्रिपद हाती घेतल्यापासून कधी नव्हे एवढा तणाव त्यांनी गेल्या वर्षभरात अनुभवला होता.

दिवाळीतले चमत्कार-२

आपला अभिजित ·
भुजबळांची `भाऊबीज' -------------- दिवाळी सुरू होऊन दोन दिवस झाले होते. छगन भुजबळांच्या घरी शुभेच्छा द्यायला येणाऱ्या कार्यकर्त्यांची रीघ थांबली नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या या चाहत्यांना, समर्थकांना थोपवणं आता अवघड झालं होतं. विशेषतः साठीचा कार्यक्रम झाल्यानंतर ही गर्दी वाढलीच होती. ""अहो, चला! आज दिवाळीतलं शेवटचं स्नान आहे ना, लवकर उटणं लावून घ्या....'' पत्नीनं आठवण करून दिली, तसे भुजबळ जरासे सावरले. ""अगं, हे कार्यकर्ते थांबतील, तेव्हा उठणार ना?'' भुजबळ चिडचिड्या स्वरात म्हणाले. ""मग त्यांना आवरायला सांगा ना!

दिवाळीतले चमत्कार-१

आपला अभिजित ·
नाराजी का `राज' ----- अभूतपूर्व रोषणाईने "कृष्णकुंज' गजबजून गेले होते. संपूर्ण परिसराला "मनसे'च्या झेंड्याच्या पताका लागल्या होत्या. सगळीकडे फटाके वाजत होते. जल्लोष सुरू होता. महाराष्ट्रातून, देशातून, जगातून आलेले हजारो कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत होते. आज खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, "मनसे'च्या कर्तव्यनिष्ठतेचा विजय झाला होता. मराठी राष्ट्रपतींनी खास अध्यादेश काढून महाराष्ट्रातून सर्व बिहारींना, उत्तर भारतीयांना, मध्य प्रदेशींना, गुजरातींना, बंगालींना, पंजाबींना हाकलून देण्याचा आदेश काढला होता.

प्रकाशाशी जुळावं नातं! .. तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

राघव ·
आज रात्री अन् उद्या सकाळी मी नेटवर येऊ शकणार नाही. म्हणून एक दिवस आधीच हा (कविता) प्रपंच!! प्रकाशाशी जुळावं नातं, अंधारातही प्रकाश व्हावा, क्षितिजावरल्या उषेसमवे, अंधार सारा दूर सरावा! पानांवरले दवबिंदू ते, प्रकाशानं तेजाळावेत, जीवनात तुम्हा सगळ्यांच्या, त्या दवबिंदुंसम, लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!! पणत्यांच्या शांत, संयमी अन् मंगल तेज सगळ्यांस स्फुर्तीदायी-आनंददायी व्हावे हीच सदीच्छा! तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! आपला, मुमुक्षु

अलौकिक

द्विज ·
अलौकिक मैत्री आलोच होतो मी नाविण्याची इथे अनुमति घेउन अज्ञानाचे अलन्कार ह्रुदयावर लेवुन एक तुच मला इथे आपलीशी वाटली सारीच सद्भावना माझी तुझ्यापाशी दाटली नसेल पाहिले मी तुला कधी सात जन्मातही पण ह्रुदयातला गाभा ओळखण्यास्तव नजर लागत नाही आपुलकीशिवाय जीव तान्हाच असतो मुळी स्वभावाशिवाय तुझ्या जीव फुलत नाही मैत्री दिग॑तराचे ओजस्वी तार छेडो आपली त्याशिवाय जगाचे पान सुद्धा हलत नाही

ससा आणि कासव

अरुण वडुलेकर ·
ससा आळसाने आणि आपल्या वेगाच्या घमेंडीने झाडाखाली झोपला आणि मागाहून आलेल्या कासवाने शर्यत जिंकली. ससा जागा झाला तसा कासवाने शर्यत जिंकलेली पाहून वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी संतापला. कासव जलचर आहे आणि आम्हा वनचरांच्या वनात येऊन आमच्यावर कुरघोडी करण्याचा त्यांना कांही एक अधिकार नाही असा घोष करू लागला. या वनावर आम्हां वनचरांचाच केवळ हक्क आहे. जलचरांनी येथून हद्दपार झाले पाहिजे असा डंका पिटू लागला. त्याच्या गर्जनांनी सगळे जंगल दणाणून गेले. वाघ,सिंह, लांडगे, कोल्हे सशाच्या गर्जनांचा आपापल्या परीने विचार करू लागले. पण नुसतेच विचार करीत राहिले.