Skip to main content

" | पालखीच्या सोहळ्यात | "

लेखक विदेश
मंगळवार, 12/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
"| पालखीच्या सोहळ्यात |" नामामधे रंगलो मी, ध्यानामधे गुंगलो मी माउलीत दंगलो मी, पालखीच्या सोहळ्यात | ओठी विठ्ठलाचे नाम, पाठी विठ्ठलाचे धाम चित्ती विठ्ठलच ठाम, पालखीच्या सोहळ्यात | कुणी गातसे अभंग, कीर्तनास चढवी रंग तो सुटेना संतसंग, पालखीच्या सोहळ्यात | एकमेका आलिंगूनी, सर्व जाऊ आनंदूनी भक्तिरसात न्हाऊनी, पालखीच्या सोहळ्यात | धावे सांजवेळी गाय, तैसे ओढतात पाय डोळ्यांपुढे विठूमाय, पालखीच्या सोहळ्यात ||
लेखनविषय:

वाचने 1264
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

विठ्ठल विठ्ठल

छान . मस्तच आपलेच नाव विजयकुमार देशपांडे ( विदेश ) आहे का ? कारण तोंड पुस्तकावर सकाळीच या कवितेला आवडली म्हणून टिचकी मारली :) अमोल केळकर