Skip to main content

मांडणी

कागदाचे झाड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

सांगायला हवं

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 14/10/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
हाच लेख पूर्वी टाकला होता पण तो कुठे गेला कळेना, म्हणून आपल्यासाठी पुन्हा उद्धव काळ खूप लोक उद्धवराव आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना करतात पण मला उद्धवरावांचे नेतृत्त्व बाळासाहेबांपेक्षा उजवे वाटते. बाळासाहेबांची सेना मूळात तेव्हाच्या सत्ताधार्‍यांच्या आज्ञेवरून स्थापन झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सत्ताधारी पक्ष लोकलज्जेस्तव जी कामे स्वतः करू शकत नाही ते करण्यासाठी कुणीतरी मदतीला हवे होते. नीट लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले ते काँग्रेसच्या विरोधात. शिवसेना स्थापन झाली काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी.

जुळ्यांचं दुखणं!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 10/10/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर. त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न. माझ्या मते, आजकाल जुळ्यांचं प्रमाण वाढलं आहे ते वंध्यत्व(infertility) साठी घेतल्या जाणाऱ्या थोड्या आक्रमक(!) उपचार पद्धतीमुळे. बऱ्याच डॉक्टर लोकांशी झालेल्या बोलण्यातून असं समजलं की हे उपचार चालू असतील तर २-३ गर्भ राहणं खूप कॉमन आहे. आमच्या बाबतीत तेच झालं असावं.

चाळिसाव्या कोसावर

लेखक रामदास यांनी रविवार, 08/10/2017 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल. आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं. घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत. मग चौथीत असताना इंग्रजी वाचायला लागलो आणि ‘हितवाद’चा वाचक झालो.

पोस्टरबाजी - ऐक दिखाऊपणाची गरज

लेखक ओरायन यांनी गुरुवार, 05/10/2017 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही शहराबाहेर, गावाबाहेर बाईकने, कारने, अथवा अन्य वाहनाने जात असतांना ,बाहेर रस्त्याच्या कडेला हास्यमुद्रेत असलेले ४,५ किंवा जास्त जणांचे टोळकं दिसतच. अर्थात हे टोळकं असत पोस्टरवर..कोणाचा वाढदिवस, किंवा कोणाची कुठेतरी लागलेली वर्णी ह्या साठी हे सर्वजण पोस्टरवर, शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी , विराजमान झालेले असतात. हे तुम्हांला तुमच्या शहरात, गावात पण मोक्याच्या ठिकाणी पण हास्यवदन करीत असतात. बर ,नाही बघायचे ठरवले तरी ते अशाप्रकारे लावलेले असतात की त्यांचे मुखदर्शन ओझरते का होईना होतेच.

मला आलेला अनुभव -२

लेखक ओरायन यांनी सोमवार, 02/10/2017 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला अनुभव -२ ह्यात मी छोटे छोटे दोन अनुभव एकत्र केले आहेत. कारण प्रत्येकासाठी ऐक ऐक वेगळा धागा काढणे शक्य नाही व ते व्यवहार्यदेखील नाही. आपण कधी पूर्णपणे आपल्यावरील ताबा गमावला आहे का ? म्हणजे कधी पूर्णपणे वेळेस्वाधीन झाला आहेत का ? ' वेळ आली पण काळ आला नाही' या उक्तीचा तुम्हाला अनुभव आला आहे का ? मला दोन वेळेस आला आहे. १. नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. माझी 'पोहायला शिकण्याची' तयारी चालू झाली होती. तसे बघायला गेलो तर हे पोहायला शिकण्याचे वय उशीराच झाले. मात्र त्याचा एक फायदा (कि 'तोटा' ?) म्हणजे आई वडिलांचे आपल्यावर वाढलेला विश्वास. काळजी करण्याचे प्रमाण कमी.

परेल-एलफिंस्टनच्या निमित्ताने ....

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 29/09/2017 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज. मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते. त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला. रेल्वेचा हा गलथानपणा आहेच.

नितीन बनतो डॉक्टर

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 26/09/2017 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
नितीन बनतो डॉक्टर ----- ( या काल्पनीक लेखातील घटनाकाळ हा १९८५च्या आसपासचा धरला आहे . ) आंबेवाडीतल्या आपल्या रुममधे आज सकाळी संजु , सोनाची दुक्कल टपकलेली पाहुन नितीन थोडा चकीतच झाला . या दोघांचेही चेहरे त्याला जरा उदासवाणे वाटले . पण लगेच स्व:ताला सावरुन त्याने हसत या बच्चे कंपनीचे स्वागत केले . "अरे वा . अलभ्य लाभ . आज सकाळीच शेरलॉक होम्स आणी वॅटसन यांची जोडगोळी या पामराकडे कशी काय उगवली ? " "आम्ही आलो आमच्या सर आर्थर कॉनन डाईलला भेटायला " संजुनेही त्याला किंचीत हसत टोला मारला . त्या तिघांनीही एकमेकांना पाडलेली ही टोपण नावे होती .

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.