Skip to main content

मांडणी

खिलजीचा माफीनामा

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 06/02/2018 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
खिलजी एक असे पात्र जे इतिहासात त्याच्या कुकर्मामुळे प्रसिद्ध झाले . प्रत्येक पटावर ते पात्र जन्माला येतच असते . नियतीचा अलिखित नियम आहे . मी देखील परत आलोय . पण माझ्या परतीचे कारण मात्र वेगळे आहे . मी परत आलोय ते फक्त माफी मागण्यासाठी. मी माफी मागणारही होतो पण त्यावेळेला मला संधीच मिळाली नाही . मी कैक धडका दिल्या , पण जेव्हा जेव्हा मी माझे नाव किंवा आडनाव टंकले त्या वेळेस माझ्या हाती अपयशच आले . असो ... जिच्यासाठी उपवास व्रत वैकल्ये केली , ती माझी आई ६ जानेवारीला देवाघरी गेली. जाईपर्यंत चूल आणि मुलांची काळजी करणारी बाई, अशीच निघून गेली ...

सौर उर्जा आणि काही शंका

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 31/01/2018 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती. <टाइम प्लीज> ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी https://www.misalpav.com/node/41559 इथे व्यक्त व्हावे. </टाइम प्लीज> फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती. वापरण्यापूर्वी काही तास ती चार्ज करावी लागते.

चलत-चित्र पद्मावतीची (रड)कथा आणि वर"करणी" स्वातंत्र्य...!

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 15/01/2018 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
तसे या विषयावर लिहिणारच नव्हतोत, परंतु मि पा वर चर्चा भीमा कोरेगाव वर लेख वाचले, मांदियाळीत चर्चा बहुत होते जाणवले, ततपश्चात "लिहून पाहू" ने झपाटले, आणि शेवटी टंकले...! तसे ऐतिहासिक संदर्भ पाहता आमच्या भूतकाळात आम्ही सदर ईसमाचे चित्रपट पाहिलेले नाहीत. (किंबहुना थेटरात जाऊन पाहिलेले नाहीत म्हणणे जास्त उचित). बाजीराव मस्तानी वा रामलीला चा एकही प्रसंग आमुच्या डोळ्यांसमोरून गेल्याचे आम्हास स्मरत नाही. हे त्यांचे बहुचर्चित चित्रपट.

अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 08/01/2018 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण) या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६:

महाराष्ट्राच्या ईतिहासातील ऐतिहासिक प्रसंगांबद्दल माहिती हवी आहे.

लेखक सतिश म्हेत्रे यांनी रविवार, 07/01/2018 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी National Institute of Technology Karnataka, Surathkal येथे संगणक अभियांत्रिकी शिकत आहे. आमच्या येथे दरवर्षी भारत दर्शन नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्यामध्ये प्रत्येक राज्यामधून आलेले विद्यार्थी त्या त्या राज्याची कला व संस्कृती सादर करतात. येथील महाराष्ट्र मंडळ देखील महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडते. यामध्ये आम्हाला (प्रत्येक सहभागी राज्याला) ऐतेहासिक गोष्टींवर आधारित दोन नाटिका सादर कराव्या लागतात.

अ क्लोथलाईन.

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 01/01/2018 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर.. निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा.. नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट.. आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट, भोकाभोकाचं बनियन.. टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट.. कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट.. चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक.. काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे, त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे दोरीवर वाळत घातलेले कपडे खूप काही सांगून जातात, घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
काव्यरस

२०१८ मधील काही महत्वाच्या खगोलिय गोष्टी !

लेखक ओरायन यांनी रविवार, 31/12/2017 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! उद्यापासुन नविन इंग्रजी व आंतरराष्ट्रिय वर्ष २०१८ सुरू होत आहे त्यानिमित्त काही मोजक्या २०१८ मधील खगोलिय घटना इथे थोडक्यात देत आहे. १. जानेवारीमध्ये २ पोर्णिमा व १ चंद्रग्रहण आहेत. पहिल्या पोर्णिमेला ( २ जानेवारी, पौष पोर्णिमा ) आपण सुपरमुन बघू शकतो.सुपरमुन म्हणजे मायक्रोमुनच्या आकारापेक्षा १४ टक्के मोठा व पर्यायाने अधिक तेजस्वी चंद्र. हाच सुपरमुन परत माघ पोर्णिमेला म्हणजे ३१ जानेवारीला बघु शकतो. ऐकाच महिन्यात दुसरा सुपरमुन आला की त्याला ंब्ल्यु मुन ं असे पण म्हणतात. २. २०१८ मध्ये ' संपुर्ण सूर्य ग्रहण ' नाही. केवळ २ छोटेसे सुर्यग्रहण आहेत.

अन्नदाता सुखी भव (क्रमशः)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 31/12/2017 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (अपूर्ण) या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/n

कमलताल

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 29/12/2017 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

अन्नदाता सुखी भव (क्रमशः)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 24/12/2017 02:19 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज