*गुरु महिमा गावत सदा*
*मन राखो अतिमोद |*
*सो भव फ़िर आवै नहीं*
*बैठे प्रभु की गोद ।।*
*...संत क़बीर*
आज शिक्षक दिन..! ज्याच्या कडून आपण काही ना काही शिकतो, तो आपला शिक्षक..! पहिला मान *"आईचा"*.. बोली भाषेपासून ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर, ती बिचारी शिकवतच रहाते.. शाळा कॉलेजच्या दिवसात, *"शिक्षकच"* आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यात मोठा वाटा उचलतात.. आपणही लहानमोठ्या
*"अनुभवातून"* शिकतो.. कधी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो.. म्हणतात ना, पुढच्यास ठेच-मागचा शहाणा..!! कधी एखादी *"वेळ"* अशी येते, की आयुष्यभर पुरेलसा अनुभव देऊन जाते..