Skip to main content

मांडणी

आठवणी

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 02/03/2021 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य आहे तिथे त्याचे दुःखही आहे. माणसांच्या विविधते प्रमाणे त्याच्या दुःखांची श्रेणी आणि त्यांची कारणेही तितकीच अमर्याद. अपवाद फक्त एका गोष्टीचा. अब्जावधी श्वास जसे एका प्राणवायूने सुखावतात त्याप्रमाणे याच अब्जावधी मनांना बधिर करणारी समान जागतिक शक्ती म्हणजे आठवणी. विज्ञानाने सचित्र खुला केलेला विश्वाचा अफाट पसारा पाहताना आपण हरखून जातो. पण त्या प्रकाशाच्या मुक्त नृत्यालाही ज्याचं चित्ररूप अजून गवसलं नाही अशा मनात साठवल्या जाणाऱ्या आठवणींची तुलना फक्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाशी होऊ शकते.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 28/02/2021 19:50 या दिवशी प्रकाशित केले.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

४ ४ ४ ४ ४ ४ ४

शेवटचा अश्रू

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 27/02/2021 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.

अध्याय ३ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 27/02/2021 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
३ ३ या अध्यायातील विषयवस्तू प्रबंधात सविस्तर लिहिली आहे म्हणून इथे संक्षिप्त रूपात सादर केली आहे.

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 21/02/2021 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ १ पान १ ते ५

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 15/02/2021 01:00 या दिवशी प्रकाशित केले.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते.

आण्णामहाराज!!!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 12/02/2021 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम." "काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?" "कळवतो म्हणाले." "हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच." "हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?" "विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी" "कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?" "अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?" "काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?" "अरे! तीन महिने झाले नोकरी शोधतोयस तू.मिळत नाहीये.वाचलास काही महिने अध्याय, टेकलंस डोकं समाधीवर आणि मिळाली हवी तशी नोकरी तर?

पडद्यांचे जग

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 12/02/2021 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
हौसेला मोल नसतं आणि निराशे इतकी स्वस्ताई शोधून सापडायची नाही. दोन्ही मनाचेच खेळ अगदी दोन टोकांवरले. हौसेत जगणं कृतार्थ झाल्याचा भास आणि निराशेत त्याच्या अंताचा. या दोन मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजे जीवन. या रेषेवरचा प्रवास मोठा गमतीदार. पण इथले बरेचसे प्रवासी भरपूर वजन घेऊन या प्रवासाची सुरुवात करतात. आणि त्याचा व्हायचा तोच अपेक्षित परिणाम होतो. रेषेवर कुठेही असला तरी त्या माणसाची जीवनातली दमछाक काही थांबत नाही. हां सांगायचं राहिलं.. ओझं पडद्यांचं. हो पडदे.. अनेकवचनी! एका स्थिर रंगमंचावर एकाच वेळी अनेक प्रयोग सादर करायचे असतील तर काय करावे लागेल?