Skip to main content

मांडणी

कुटचलनाची बाराखडी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 05/04/2021 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी सध्या मिपावर बाराखडीची चलती आहे. त्यामुळे म्हटले आपणही एक जिलबी टाकूया. तर "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्या शिकवावे , शहाणे करून सोडावे सकाळ जन" या समर्थांच्या उक्ती प्रमाणे मी हा धागा लिहितोय. कोणाच्या फायद्या तोट्याची जबाबदारी माझ्यावर नाही.अर्थातच प्रत्येकाने लेख आपल्या जबाबदारीवर वाचावा किंवा अनुकरण करावा हे सांगणे नलगे. पुढील माहिती विकीवरून साभार --- तर १९८३ मध्ये अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाम यांनी इ-कॅश नावाच्या अज्ञात क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक पैशाची कल्पना केली.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखक लेखनवाला यांनी बुधवार, 31/03/2021 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

मिपाकरांच्या वाचनखुणा.

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 31/03/2021 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे. मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे.

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज - विजय सिंह गायिकांच्या संगीताचा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 16/03/2021 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
आस्वाद घेत आहेत असे दाखवणारे हे राजस्तानी शैलीचे पेंटींग आहे. ओक आणि मनोज दाणींचा व्हॉट्स अॅपवरचा संवाद ओक- ४९ वरील चित्राचे सूक्ष्म निरीक्षण करताना पाहून वाटते की त्यातून वेगवेगळ्या घटनांचा, काळाचा संदर्भ असावा. दाणी - paan 47 na? ti mulgi nasun rani asnyachi shakyataa pan aahe ! ओक - पसंद अपनी अपनी... ते चित्र असेच आहे कि त्यातून अनेक शक्यता दिसाव्यात. दाणी - museum title says a harem scene ... ओक - प्रत्येक गोष्टीला काळ वेळ लागते. सायंकालीन नृत्य, नाट्य, संगीत महफिल सकाळच्या लोटा परेडच्या वेळी शोभत नाहीत.

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज -शनिवार वाडा सन १८२०

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 14/03/2021 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत कष्टपूर्वक मिळवलेल्या जुन्या वास्तूंपैकी मराठी मनाला भावणारी शनिवार वाडा वास्तू सन १८२० साली एका चित्रकाराच्या दृष्टीतून कशी दिसत होती याची झलक मिळते. मुख्य प्रवेश द्वारावरील जयपूर शैलीतील कलाकुसर १९ झुपकेदार फुलांंचे डिझाईन वरच्या पट्टीतील सजावट मोहक दिसते. 2 सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते. मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग.

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरच्या राजवाड्यातून जाताना

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 12/03/2021 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
खालील मेसेज व्हॉट्स अॅप वरून झाले होते. त्यातून या चित्रावर काही भाष्य केले गेले होते तेही सादर... १. Shashikant Oak : मला जास्त आवडले ते जयाजी शिंदे यांच्या शिकारीला जातानाचे पेंटिंग. मनोज दाणी : ho surekh ahe te, hence right at the front एडविन लॉर्ड्स वीक्स यांचे पुर्ण चित्र मनोज दाणींनी मला पाठवले. ३ Shashikant Oak : हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय.

मामाच्या गावच्या आठवणी

लेखक सत्य धर्म यांनी मंगळवार, 09/03/2021 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. सकाळी सकाळी मुलीने मोबाइलला हे गाणे लावले आणि डोळयांपुढे मामाचा गाव उभा राहिला. माझ्या लहानपणी माझ्या मामाचे गाव म्हणजे माज्यासाठी जणु स्वर्गच होता. उन्हाळ्याची सुट्टी, गणपती आणि दिवाळीची सुट्टी याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत राही. मामाच्या गावावरून आल्यानंतर माझ्या मित्रांमध्ये तिथले वर्णन आठवडाभर चालत राही. माझ्या मामाचे गाव म्हणजे रहिमतपूर असं म्हणतात कि अफझल खानचा सरदार रहिमतखान याच्या नावावरून याला रहिमपूर नाव पडले.

थोतांड..थोतांड..थोतांड..

लेखक गवि यांनी गुरुवार, 04/03/2021 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
थोतांड थोतांड थोतांड.. जे जे पहावे ते थोतांड.. नाझींचे थैमान? थोतांड न्यूटन महान? थोतांड धरतीची गोलाई? थोतांड नभाची निळाई? थोतांड चंद्रावर स्वारी? थोतांड मंगळाची वारी? थोतांड कार्बन उत्सर्ग? थोतांड कोरोना संसर्ग? थोतांड बोसांचे मरण? थोतांड नर्मदा धरण? थोतांड ग्लोबल वार्मिंग? थोतांड त्सुनामी वार्निंग? थोतांड वृक्षांची निकड? थोतांड इव्हीएम निवड? थोतांड विमान नाहीसे? थोतांड आरोप बाईचे? थोतांड नऊ अकरा? थोतांड पृथ्वीच्या चकरा? थोतांड लसीला होकार? थोतांड चिन्यांची माघार?