मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

शब्दखेळ

स्पंदना ·
लेखनविषय:
शुभ् प्रभात!! मंडळी काल अंमळ वजनदार नाश्त्यान दिवसाची सुरवात झाली. त्यावर उतारा म्हणून जातीन स्वैपाक घरात राबून मी; ही साधी झुणक्याची वडी, आणि ज्वारीची भाकरी आजच्या न्याहरी साठी तयार केलीय. (कवितेची थोडीशी हिस्ट्री सांगण जरुरी आहे. म्हंटल पावसावर कविता करावी. बाहेर छान सरी वर सरी कोसळत होत्या. थोडे तुषार अंगावर घेत, घेत 'लाइव्ह' कविता लिहावी असा विचार करून; जरा दारांत बसले. झालं. असं मोकळ वातावरण बघून आमचा कवितेचा मूळ शब्द "सर " मोकाट सुटला!! उनाडक्या करत खेळत सुटला. कोणीही ऐकेना . एका वाक्या नंतर ओळीत उभे राहीना!!

प्राजुच्या "फुलांची आर्जवे" कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ

दत्ता काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी रविवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजन वाटीकेमध्ये पोहोचलो. "आर्जवे फुलांची " हया प्राजक्ता ( प्राजु ) च्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ. कार्यक्रमाला सुरवात होऊन जवळपास अर्धा-पाऊण तास झाला होता. विशेष म्हणजे प्रकाशित होणार्‍या कवितासंग्रहाची कवयित्री - प्राजक्ता - काही कारणामुळे समारंभाला उपस्थित राहू शकली नाही. कार्यक्रम चित्तरंजन वाटिकेत झाडांच्या दाट सावलीत घेण्यात आला होता. मान्यवर पाहुण्यांसाठी टेबल-खुर्च्या आणि इतर उपस्थितांसाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या. झाडांवर स्पिकर्स लावण्यात आलेले होते. एकूण व्यवस्था अतिशय चांगली झालेली होती.

"त्या" धाग्याबद्दल मिलिंद फाटक यांचे स्पष्टीकरण

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा हा लेख(?) http://misalpav.com/node/12218 काही दीवसांपुर्वी तुम्ही वाचायचा त्रास घेतलात त्याबद्दल धन्यवाद........... त्यातली मध्यवर्ती भुमिका करणारे 'मिलिंद फाटक' त्या लेखात ज्यांना 'हीरो' असे संबोधले आहे ते.ह्यांनी त्यावर ही प्रतिक्रिया दीली......... "धन्यवाद,comments छान आहेत,पण एक चुक आहे.फक्त टकला म्हणून नाही तर माझ्या चेह-यावर डाग ही असतात,मी वयाने मोठाही असतो आणि मला चस्मा ही असतो." मग मी जरा आगावपणा(?) केला,आता तो आगावपणा का ते सांगतो थांबा नंतर......पहील मी काय प्रतिसाद दीला तो लिहतो....... "शतशा: आभार फाटक सर, अहो पण फाटक सर मुद्दा कायम राहतो ना!!

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध

शशिकांत ओक ·
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.
आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...
मित्र हो, ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही.

मला आवडलेला चित्रपट!!

स्पंदना ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
weeping camel कथा आहे एका भटक्या कुटुंबाची आणि त्यांच्या जित्रापाची!! वसंत ऋतूच्या सुरवातीला यांच्या जित्रापाचा विणीचा हंगाम. कथा घडते मन्गोलिअन वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर. दूर वर पसरलेले वाळवंट आणि खुरटी झुडुपे. जित्राप म्हणजे मेंढ्या, शेळ्या आणि उंट. हे नोमाडीक कुटुंब त्यांच्या जित्रापावर पुरे पूर अवलंबून, पण म्हणून या नात्यात कुठे ही व्यवहार वां पिळवणूक अजिबात जाणवत नाही. हेच तर या चित्रपटाच मर्म.

महाराष्ट्र प्रेम

गोगोल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी खर तर हा लेख जयंत कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र प्रेमवरील लेखाला प्रतिसाद म्हणून लिहीत होतो. पण प्रतिसाद लिहील्यावर कळले की त्यांनी (किंवा संपादकांनी) लेखच उडवून लावला. म्हणून हा प्रतिसाद येथे टाकत आहे. थोडासा प्रक्षोभाक आहे आणि मला माहीत आहे की यावर खूप हल्ला होणार (आणि कदाचित विडंबनही येणार:), पण ठीक आहे, मला जे वाटते ते मी येथे मांडतो आहे. जर चुक वाटली तर साधक बधक चर्चा करुन मला तुम्हाला काय वाटते ते पटवून द्या. सर्वप्रथम महाराष्ट्रानी भारताला काय दिले यात स्वातंत्र्यपुर्वीचा काळ समाविष्ट करणे अत्यंत चुकीचे आहे.

आज साठी खास..

स्पंदना ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी नमस्कार, आज ९ मे; तर आजच्या दिवसाची सुरुवात हिरकणी ला नमन करून करूया. काय? कोण हिरकणी? अहो काजळणाऱ्या दिशांना न डरणारी ; डोळ्यातल्या पाण्यान हतबल न होता उलट ते पाणी शिंपून मातृत्वाच रोपट जोमान जोपासणारी; तान्हुल्याच्या ओढीन शिवरायांचा आदेश धुडकावून रायगडाचा बुरुज लांघणारी. हो तीच; जिची खुद्द शिवबांनी मोहोरांनी ओटी भरली ती . . हिरकणी. जिच्या मातृत्वाची गाणी गात आज ही राय गडावर तो बुरुज उभा आहे ती...हिरकणी. खर तर हा विषय शुची ताईन्चा ; त्यांनी आधीच सुरु केला पण काय झालं कोणास ठाऊक एकदम "आलामंतर कोलामंतर...

दुनियादारी-एक फोटु जमावण्यासाठी प्रयत्न update 2

शानबा५१२ ·
लेखनप्रकार
माझ्या एका मित्राने orkut वर "दर वर्षी उन्हाळ्यात हजारो पक्षी पाण्यावाचून मरतात.तेव्हा कृपया आपल्या घराच्या छतावर एका भान्ड्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा" अस लिहल होत.खरच कौतुक करण्याजोगा प्रयत्न आहे.त्या अनुषंगाने(?) काहीतरी करायच म्हणातोय.म्हण्जे फक्त फोटु लावुन काय होतया...कायत्री केल पायजेल काल एका कबुतराला वाचवायला म्हणून पकडायला गेलो तर ते जोरात उडाल व पडल......म्हटल च्यायला चांगला बसलेले उगाच हलवल. पण अस कायतरी करायचय म्हण्जे काहीतरी 'निस्वार्थ चांगल काम' .........internetच्या माध्यमातुन काय करता येईल?? तत्सम काही कपना असल्यास सुचलवलत तर आवडेल http://duniyadari.webs.com नोट : क्रुपय

मिसळपाव...

नीलकांत ·
लेखनप्रकार
नमस्कार, आपण सर्व मिपाकर हे जाणतो की मिसळपाव हे संकेतस्थळ श्री तात्या अभ्यंकर यांनी स्थापन केले आहे. ते या संकेतस्थळाचे मालक सुध्दा आहेत. गेल्या काही महिण्यांपासून मिपाच्या व्यवस्थापनाकडे तात्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने मी व संपादक मंडळानेच मिपा सुरू ठेवलंय. आता सुध्दा येत्या काही काळ तात्यांना मिपाकडे लक्ष देणे होणार असे दिसत नाही. त्यामुळे तात्यांनी आधी अघोषीत असलेली व्यवस्था घोषीत केलीये की मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार नीलकांत कडे असतील. यात मालकी हक्काबाबत कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे त्याबाबत वर केलेल्या विधानाशिवाय काहीही उल्लेख करने गैरलागू आहे.