Skip to main content

कविता

संध्याकाळी तू गंगेतीरी

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 01/09/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

शब्द

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 29/08/2019 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द निरर्थाचे भोई शब्द अर्थभार वाही शब्द धूसर सावली शब्द दाहक बिजली शब्द कोरडा व्यापार शब्द अस्तित्वाचे सार शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द अटळ कुंपण शब्दापार मुक्तांगण
काव्यरस

ओठात दाटलेले...

लेखक निलेश दे यांनी बुधवार, 28/08/2019 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी दावू नकोस आता ते घाव ओळखीचे गावात बांधलेला वाडा उजाड आहे पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे निलेश देऊळकार अडगाव बुll 9767888855
काव्यरस

शोक कुणाला? खंत कुणाला?

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/08/2019 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

कृष्णजन्म

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 23/08/2019 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा ! कुठून रे अक्षरं आणू? कसे शब्द बांधू? कश्या भावना गुंफू? हजार नावं घेऊ? का शब्दब्रह्म गाऊ? तुळशींनी सजवू? मनमखरात बसवू? का पंचप्राणंच अर्पू? सगळंच उष्टावलयंस तू ? कशाचा नैवेद्य दाखवू? निळाईसंग उत्तुंग आभाळी, सावळदंग अभंग सावली, मिस्कीलढंग अनंग माऊली, मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।। सावरीत मुग्ध अलगुज, ऐकवीत गुप्त हितगुज, खेळवीत मुक्त गाईगुजं, प्रकटीत तृप्त आत्मगुज ।। तुज प्रकाशे चेतविती, संध्या या गर्भवती, शुद्ध चैतन्या प्रसविती, पुन्हा आकाशी उगविती ।। जन्मांचा जन्म जिथे, मृत्यूंचाचा मृत्यु जिथे, दिशांचा अंत जिथे, नियतीला खंत जिथे ।। शब्दांना सारूनी मागे, देहाला ठेवुनी जागे, बुद्धीच

महापूर

लेखक बी.डी.वायळ यांनी शुक्रवार, 23/08/2019 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
महापूर वरुणराजाच्या अंतरी आले | काळे मेघ जमा केले | अचानक बरसु लागले | भूमीवरी ||1|| पाऊस पडला मुसळधार | तंव नद्यांना आला पूर | बुडाली खेडी आणि शहरं | तयांमध्ये ||2|| सांगली आणि कोल्हापूर | तेथे आला महापूर | कित्येकांचे घर संसार | वाहून गेले ||3|| पाण्याची पातळी वाढता | लोकांची वाढली चिंता | पुढे काय होईल आता | कळेना काही ||4|| पुराचे पाणीजेंव्हा वाढले | लोकं घरात अडकुन पडले | कोणी गच्चीवरती चढले | भिती पोटी ||5|| मिडियांनी खबर घेतली | बातमी लोकांसमोर आणली | सरकारी यंत्रनाही धावली | मदतीला ||6|| एनडीआरएफ़चे जवान आले| बचाव कार्य सुरु झाले | जीव धोक्यात घालून गेले| पाण्यामध्ये ||7|| तेंव

स्वरराधा

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 23/08/2019 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
भैरव वा भटियार पहाट फुलवत येती, स्पर्श जणू कान्ह्याचे राधेला उठवुन जाती. ठाऊक तिला सारंग माध्यान्ही झुलवत येतो, "गंध" न त्यास स्वत:चा तरि वृंदावनी घमघमतो. यमन असा कान्ह्याचा यमुनेचे श्यामल पाणी. निनाद गोघंटांचा सांज करी कल्याणी. मालकंस वा जोग, अमृत बरसे गात्री. कान्ह्याच्या ओठी वेणू तिच्याचसाठी रात्री. कणकणात भिनली आहे मल्हाराची आस, मेघ पेटवून जातो मयूरपंखी प्यास. पण सूर भैरवीचा का राधेला माहीत नाही? युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..
काव्यरस

श्रावणसरी

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 21/08/2019 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
।। श्रावणसरी ।। भिजून गेल्या फांद्यांवरती, बसूनी सहजच गाती पक्षी, अलगद जाई वाऱ्यावरती, सप्तसुरांची मोहक नक्षी । सुईसारख्या चोचींमधुनी, दशदिशांना निरोप जाती साद घालती कोणा कळेना, दूरदूरची ओवून नाती । फुलांफुलांचे श्वास टिपुनी, दूरदूर हे वायू वाहती, परागमोहित किटक येऊनी, मकरंदाची गाणी गाती । वसुंधरा ही नटुनीसजुनी, पशुपक्ष्यांना ठेवी भुलवुनी, भेट घेण्या तिच्या नायका, सकलसृष्टीला जाई घेऊनी । त्यांस मिळाले निरोप नकळत, तरी अजुनी दर्शन नाही, एका सरीचीच मिठी देऊनी, पुन्हा पुन्हा तो निघून जाई। त्याच मिठीने शहारते ती, गर्भधारणी हरितमोहिनी, क्षणाक्षणांची प्रसवशालिनी, स्वर्गसुंदरी ओजमानिनी । ऐश्वर्

देवघर

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 19/08/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

अश्वत्थामा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 16/08/2019 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
।। अश्वत्थामा ।। क्षितिजावर थबके रवि, पोर्णिमेत रेंगाळे शशि, एक न जाई ओटी, दुजा रातीच्या कंठी, एक तेजोमय गर्भ, दुजा शांतीतच गर्क, पूर्वेस वाजता शंख, पृथ्वीस वाटते दुःख, अवचित संध्याकाळी, अवनीही होई हळवी, कधी उजळें प्रकाशहाती, कधी निथळें चांदणराती, विधाताही निष्ठुर होई, मग निर्णय कोण घेई? भावनांचे दीप जळती, आवेगांचे लोळ उठती, मानवास न उमगे कोडे, अश्रू का दाटती नयनी? बघता सुवर्णजन्मा वा पाहता तम पश्चिमा, घेऊन फिरावा माथी, ओला शाप कपाळी, अश्वत्थामा सगळेच, रोज संधीप्रकाशी । - अभिजीत श्रीहरी जोगळेकर