Skip to main content

कविता

मौनाइतके कुणीच नाही

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 08/11/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग, उत्कट, उधाणले तरि किनार ओढुन जसा समिंदर.. स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे जळाकाठचे वा औदुंबर.. प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस प्राजक्तासम हळवे लोभस.. काजळ रेखुन कधि भिडणारे खट्याळ हट्टी अवखळ ओजस.. कितीहि काही आत उकळले संतापाला घट्ट आवरे.‌ शालिन कधि तर भळभळणारे मिटल्या ओठी दु:ख गोजिरे.. ....... असे देखणे, असे बोलके मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.
काव्यरस

कविता : भेट मित्रांची…

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 05/11/2019 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींना उजाळा भावनांचा उमाळा शब्दात जिव्हाळा दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची… मित्रांची सतत मस्ती कधी मस्तीची सक्ती सख्याची जीवापाड दोस्ती कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची… मित्र कमी बोलणारा परी डोळ्यात जपणारा दोस्त शब्दात खेळणारा पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…

हस्तर कविता :- महायुती

लेखक हस्तर यांनी सोमवार, 04/11/2019 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तर कविता :- महायुती महायुती करून काय फायदा झाला ? जर सरकार एकत्र स्थापन करायचे नव्हते तर निवडणूक का आले एकत्र लढ्याला ? एक दुसऱ्याचा जागा अडवायला ? युती नावाचा प्रकार केलाच का ? एक दुसऱ्याची मते लाटायला ? मजा येत होती ५ वर्षे भांडायला अफझलखान म्हणून एक दुसऱ्याचे उणे दुणे काढायला का आनंद झाला जनादेश झुगारायला संगीत खुर्ची खेळ खेळून मनोरंजन करायला शेतकरी लागले आसू ढाळायला आणि तुम्ही बस आपले आपले शपत विधी करायला
काव्यरस

' भाज्यांचं संमेलन '

लेखक mukund sarnaik यांनी सोमवार, 04/11/2019 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
' भाज्यांचं संमेलन ' एकदा भाज्यांच संमेलन भरवलं प्रत्येकाचे महत्त्व सांगायचे ठरवल हिरवेगार घोसावळ आले पुढे म्हणाले भजी करुन खा बरे.कांदा आला हसत हसत माझ्या शिवाय तुम्हाला नाही करमत.मी जोडीला आलो बटाटा दोघांचा मिळुन बनवा चटकदार बटाटेवडा. काटेरी वांग्याचा रंगच न्यारा ताजी ताजी घेऊन भरीत भाजी करा.मी गोल लाल गरगरीत भोपळा शेजारी उभा आहे दुध्या भोपळा आणि खरं सांगु का ?

जुनसर

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 01/11/2019 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
मॉल संस्कृती व ऑनलाईन शॉपिंगच्या झगमगाटापुढे टिकण्यासाठी बऱ्याच दुकानांना कात टाकावी लागली.

सैराट

लेखक एपी यांनी बुधवार, 30/10/2019 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
सैराट पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी. * तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी. * मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी. * मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी. * -डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)

सैराट

लेखक एपी यांनी बुधवार, 30/10/2019 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
सैराट पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी. * तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी. * मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी. * मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी. * -डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)

गुन्हेगार!

लेखक फिझा यांनी बुधवार, 30/10/2019 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
गुन्हेगार! एकेका श्वासाचा हिशोब मांडून केलेले आरोप ती आरोपी असल्याचे सिद्ध करत होते ..ते ! "तिचं जगणं " हाच कसा गुन्हा असू शकतो… नेहमीच ? पण गीतेवर हात ठेवून तिनेही मान्य केले की जगण्याचे विशेष असे काही कारण नाहीये! " तो मर क्यो नहीं जाती ?" तटस्थ लोकांनी प्रश्न विचारला! नेहमीसारखाच ! "हवं तर मृत्युदंड देऊन टाका, खूप हत्या केल्या आहेत मी ! एक ना अनेक इच्छा, आकांक्षा मारल्या आहेत कित्येक वर्ष , अगदी चपखलपणे…! कुणाला कसलाच सुगावा न लागू देता!" ती हे बोलून हसू लागली, नेहमीसारखीच ! तिच्या 'असण्या'चा गुन्हा सिद्ध झाला आणि जन्मठेप ठोठावण्यात आली, "हट्टच असेल जगण्या

गंमत घ्यावी..‌

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 19/10/2019 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते, चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके. करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी. काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी.. कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल. हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल. फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल .. त्या पानाचा भार केवढा??
काव्यरस