Skip to main content

कविता

कविकल्पना

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 18/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पंख मिळावे कल्पनांचे आकाश व्हावे कागदांचे भावनेची बनून लेखणी मनपाखरू स्वछंद उडावे शब्द व्हावे जाणिवांचे स्पर्श त्यांना अर्थांचे विचारांची करून मांडणी कवितांनी जन्म घ्यावे ध्यास लागो तालासुरांचे वेड लागो मज बोलांचे त्या बोलांची बनून गाणी रसिकांनी गात रहावे
काव्यरस

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 18/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।

(कपाळ)मोक्ष!! :-)

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 15/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व व्यर्थता उमजत असते तरि चित्ताला थारा नसतो संदेशाची तिच्या प्रतीक्षा मी प्रतिचातक बनुनी करतो हस्तसंच मज गमे उपांगच क्षणिक दुरावा असह्य होतो 'अजुनी उत्तर का येईना?' प्रश्न मनाला कच्चा खातो सतरा कामांचा खोळंबा भार्या घोष ठणाणा करते तरी पालथी घागर माझी आंतरजालावर गडगडते शेवटची कधि 'दिसली' होती किती त्यावरी प्रहर लोटले मोजुन घटिका तिज गमनाच्या पंचप्राण कंठाशी रुतले अन्य पुरुष तर नसेल कोणी? भिवविति लाखो शंका हृदया 'निळ्या खुणे'ला विलंब होता चलबिचले मम अवघी काया कुठे वावगे, अधिक-उणे कधि चुकून बोलुन मी गेलो का, तपासतो ते पुनःपुन्हा मी तरी न होई निरसन शंका अखेर उगवे सूर्यासम ती हर्षवायु मज

"गंमत केली" म्हणालास तू...

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 14/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
"गंमत केली" म्हणालास तू "कळले मजला" मीही म्हटले. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे काय अन् खोटे कुठले. लाईक होते असंख्य त्यावर डीपी जेव्हा नवा ठेवला पाठवले तू smile जेव्हा इथे खुशीचे तरंग उठले. नुसते smile, ठाक कोरडे तरी पोचते ओल त्यातली. एक इमोजी सांगून जातो शब्दांना जे नसते जमले. म्हणो कुणी हा सोशल मीडिया नाही शाश्वत फक्त दिखावा. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे काय अन् खोटे कुठले.

बटाट्याचे उपयोग

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
बाटाट्याचे उपयोग स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता || माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा खरे नाही वाटले मला तेव्हा तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा || " खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच तोटा || कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव चढ्या दराने गंजले सारे रंकराव आता मला आला आहे मान मोठा || कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा || माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी किंवा करा मिक्

माहेर, सासर

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 08/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर अहो डॉक्टर काढा की माझे वेंटीलेटर मला काही झाले नाही बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर (कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर) न मी आजारी न मी बेचैन डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन? काढा की माझे वेंटीलेटर थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर काढा की माझे वेंटीलेटर इसीजी नका करू तुम्ही पल्सही नका पाहू कोणी लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर काढा की माझे वेंटीलेटर पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले काळजी घेण्या

कव्वाली: तुला पाहिले की

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 05/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
कव्वाली: तुला पाहिले की किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते पण तुला पाहिले की काळजात धकधक होते किती तू वार केले माझ्या हृदयावर खोल जखमा वरून केल्या त्यावर नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये तुला पाहिले की काळजात धकधक होते सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी? तुझा चेहेरा समोर जेव्हा जे

दुर्वास

लेखक निराकार गाढव यांनी मंगळवार, 03/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओजस्वी संन्यासी ज्यास विमुक्तीचा ध्यास । करि ध्यान रात्रंदिन करि शास्त्रांचा अभ्यास ।। रुक्ष ज्याची दिनचर्या करि कडक उपास । ओढी अतोनात कष्ट किती सेवेचे सायास ।। ऐसे दिन कित्ती गेले हिमालयाच्या कुशीत । तैसा राहून एकला जाले महीने, वरिस ।। पण एके दिनी येता मातापित्यांचा आठव । परतला मूलग्रामी, गृही, शोधुनिया ठाव ।। जैसा परतला गृही, दिसे गर्दी, कोलाहल । दिले झोकून संसारी झाला कल्लोळ अपार ।। साही अपेक्षांची ओझी स्वार्थी, पोटार्थींची ढोंगं । होई वेळोवेळी क्रोधी, खूप व्याकूळ, व्याकूळ ।। मग एके सायंकाळी झाला वदीता मातेस । मनातली तगमग, सारा मनातला त्रास ।। "हिमालयी बैसोनिया केले होते किती तप ।

ती सर ओघळता..

लेखक आनंदमयी यांनी सोमवार, 02/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
ती सर ओघळता सोबतीस मी झरतो तो मेघ झुरावा तैसा मीही झुरतो आपुलेच काही तुटुन ओघळून जावे खेदात तशा मी कणा कणाने विरतो... ती सर ओघळता विझती स्वप्नदिवेही अन दिवसासंगे विझून जातो मीही अन लख्ख काजळी गगनी दाटून येता मी आशेचे कण शोधित भिरभिर फिरतो ती ओघळता मी सुना एकटा पक्षी पंखांच्या जागी असाह्यतेची नक्षी शेवटास मीही काव्यपंख लेवून आठवांभोवती तिच्या नित्य भिरभिरतो ती सर ओघळता उरे न काही बाकी सहवास सरे अन अंती मी एकाकी ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो ©अदिती जोशी