Skip to main content

कविता

वळण

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 29/03/2020 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
गुलमोहरांच्या आपल्या त्या कावळ्या चिमण्यांच्या ओट्यावर. काल तु म्हणालीस 'वाट बघ' आता आपलं कसं म्हणून पुस्तकांची पानं उचकत आतल्या आत गोठून गेलो एका पानावर, मोगर्‍याच्या वेलीशी, फांदी सोडून घेतेय आपले हात. दारातून दिसतेय मला, आयुष्याचा हिशेब बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी, आणि हळद लावून बसलेली भेदरलेली नवरी. शहरापासून मरणा अगोदर कोण पोहोचतो, म्हणुन. भूके कंगालांचे तांडे सरकताहेत हळू हळू गावांकडे. सगळीच तीर्थस्थाने, महापुरुष आठवून कोणीच येत नाही डोळ्यासमोर, हडबडून, गडबडून, घामाने चिंब होऊन. टीटवीचा आवाजही देह चिरुन जातो. आपलं ठरलंय, विना आणाभाकांचं.

विनवणी

लेखक चलत मुसाफिर यांनी गुरुवार, 26/03/2020 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
राहु दे तव सर्व जिवलग खास तव यादीमध्ये पण मला त्या 'भाव'गर्दित मुळिच तू मोजू नको चालु दे संवाद प्रेमळ त्या तुझ्या मित्रासवे धाडिला मी जो बदाम मुळिच तू पाहू नको घेउनी दोस्तास जा तू पेयप्राशनकारणे फक्त 'त्या' अपुल्या ठिकाणी त्यास तू नेऊ नको प्रश्न चावट तो विचारिल, ऐकुनी हसशील तू आपले हळवे इशारे त्यावरी उधळू नको राहु दे मज एकला, मम स्मरणतीरी गे सखे रांगेत मी राहीन येथे, तू असे समजू नको - चलत मुसाफिर

मास्कमधून

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 22/03/2020 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाहीत तुला पाय तरी देशोदेशी जाशील गावागावा-वस्त्यांमधून द्वाडासारखा फिरशील तुझी असंख्य भावंडे माजवतील हाहाकार पण घे लक्षात, आमच्यात आहे शिल्लक प्रतिकार जितका झपाट्याने तू पोखरत जाशील आत तितकीच उसळून उठेल अशी माणसाची जात माणूस मारणं कदाचित असेल सोपं काम रे पण दाखव जिंकून त्याला म्हणशील मनात 'राम रे!' माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)
काव्यरस

मैत्री!

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 20/03/2020 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
टीप: 'केयलफिड्डी' या कवितेशी आशयात्मक साम्य भासल्यास योगायोग समजावा बरं का! 'केयलफिड्डी' दुवा https://www.misalpav.com/node/46119 ------ मैत्री! बाईचे दो सख्खे मैतर पहिला काका दुसरा अप्पा रोज मारते अलटुन पलटुन हाटसापवर गुलुगुलु गप्पा मैतर दोघे पक्के डांबिस बाई त्यांचा नाजुक बिंदू आव परंतू आणिति ऐसा विनयाचे जणु साती सिंधू रोजरोजच्या गप्पा ओल्या खूष जाहती अप्पा काका पाहु लागती स्वप्ने चावट मनात बांधुन "वाडा" पक्का परंतु बाई आहे खमकी दाद कशी ती लागू देइल! झुलवत ठेवी दोघांनाही धाडुन चावट बदाम, स्माइल दोघांमंध्ये संख्या छत्तिस तोंड पाहणे पसंत

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/03/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

असुनी स्वत:च पाशी

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 15/03/2020 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
अध्यात्म मोप झाले, व्यवहार तो सुटेना अंतर्मनात चाले, तो घोळही मिटेना   मी एकटाच आलो, जाईन एकटा मी गर्दी कशास जमली? उत्तर कुठे मिळेना   विज्ञान हाच पाया, विज्ञान हीच निष्ठा मानून चाललो तर, तेही पुरे पडेना   दिक्काल वेग सारे, सापेक्ष एकमेका स्थिर वेग का प्रकाशा, बुद्धीस हे गमेना   बुद्धी पल्याड सृष्टी, मी त्यात एक बिंदू असुनी स्वत:च पाशी, मी कोण हे कळेना

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 11/03/2020 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला असा तो व्हायरस पुचाट गेला घाबरून साहेबांना ||ध्रू|| आले आले ते परदेशी घेवून आले व्हायरसला खोकून शिंकून झाले बेजार त्यांनीच आजार पसरवला खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या एकदा व्हायरसचा आवळा गळा कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||१|| कसला हा विषाणू व्हायरस कोरोना नावाचा चायनाचा थुंकू नका, हात तोंड धुवा मास्क बांधा तुमच्या तोंडाला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||२|| कितीक आजार आले अन गेले स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले चांगले खा प्या अन निट फिरा सांभाळून आपल्या आरोग्याला मंत्र हाच असे नाही दुसरे काही व्हायरसपासून दूर रहायला कोरो

का चाफा म्लान पडला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/03/2020 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
का चाफा म्लान पडला कसे शशीस पडे खळे * कोमजले ताटवे फुलांचे. का बाग विराणसी दिसे.. * ओघळले काजळ गाली नेत्र का असे मिटलेले? * अधर का असे अबोल मुख चंद्रमा का मलूल? * काय चूक मम कळेना हा रुसवा संपता संपेना * भास की आभास आहे प्रवास एकट्याचाच आहे * कोणत्या जगात तू कुणास ठाऊक आहे? * तुला भेटण्यासाठी सखे देहाचा अडसर आहे... avi

अपुर्ण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 08/03/2020 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अपुर्ण का कोरतेस, काजळ तु कुरंग नयनात, नसेल बघणार मी, तर श्रुंगार व्यर्थ आहे * का लिहितिस त्या भावपुर्ण कविता नसेल गाणार मी, तर ते शुष्क शब्द आहेत * जरी माळला ,सुगंधित मोगरा तु कुंतलात स्पर्षाविना माझ्या, तो साजणे, गंधहिन आहे * लावलेस जरी अस्मानि सुर तु गळ्यातुनि माझ्या साथि विना ति मैफित अधुरी आहे * जरी जगात प्रेम आहे, हे पुर्ण सत्य आहे तरी माज्या विणा साजणे, मात्र सारे मिथ्य आहे * का रेखाटतेस हट्टाने ,सुख चित्र भविष्याचे भरु देत रंग मजला, अन्यथा ते बेरंगी आहे * समजुन घे, तु माझी,मी तुझा हे प्राक्तन आहे एकमेका विना आपल्या दोघांचे जिवन अपुर्ण आहे

तुला बापू म्हणू की बाप्या ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/03/2020 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुला बापू म्हणू की बाप्या ? स्वतःच्याच स्खलनशीलतेने असुरक्षीत ईतरांनाही असुरक्षीतता वाटणारा तुला बापू म्हणू की बाप्या ? जीवातला शिव भुकेला प्रणयाच्या लीलेला निसर्ग सुंदर प्रकृती मायेच्या प्रितीला प्रितीची महती निवड स्वातंत्र्याची रिती न समजलेला तुझ्यातला दांभिक भद्रतेचे नाटक रचणारा केयलफिड्डी कुरवाळणारा अभद्र बाबूराव मायेच्या प्रितीला निवड स्वातंत्र्याची रितीला पारखा झाला असेल तर त्याला जरा ताळ्यावर आण, शिकव त्याला संस्कार प्रितीचा निवड स्वातंत्र्याच्या रितीचा शिखराला आधार असेल जर अनसुय निरपेक्ष समर्पित प्रितीचा तरच तुला क्रौंच द्वयाच्या मीलनाची शीखरावरच्या स्खलनाची