Skip to main content

कविता

तुला बापू म्हणू की बाप्या ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/03/2020 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुला बापू म्हणू की बाप्या ? स्वतःच्याच स्खलनशीलतेने असुरक्षीत ईतरांनाही असुरक्षीतता वाटणारा तुला बापू म्हणू की बाप्या ? जीवातला शिव भुकेला प्रणयाच्या लीलेला निसर्ग सुंदर प्रकृती मायेच्या प्रितीला प्रितीची महती निवड स्वातंत्र्याची रिती न समजलेला तुझ्यातला दांभिक भद्रतेचे नाटक रचणारा केयलफिड्डी कुरवाळणारा अभद्र बाबूराव मायेच्या प्रितीला निवड स्वातंत्र्याची रितीला पारखा झाला असेल तर त्याला जरा ताळ्यावर आण, शिकव त्याला संस्कार प्रितीचा निवड स्वातंत्र्याच्या रितीचा शिखराला आधार असेल जर अनसुय निरपेक्ष समर्पित प्रितीचा तरच तुला क्रौंच द्वयाच्या मीलनाची शीखरावरच्या स्खलनाची

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 02/03/2020 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते एक चांदणी माझ्या, घरात डोकावते मी बसतो दडून, तिच्यापासून ती हलत नाही, टक लावते माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र अमीट असल्याच्या, थाटात वावरते उशीरा कधीतरी, फिरते माघारी ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते रात्रभर छळते, मला जागवते पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते - संदीप चांदणे

आजि मराठीचा दिनु!

लेखक Sumant Juvekar यांनी रविवार, 01/03/2020 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठीचा दिन ठोकू घोषणा भर्पूर ! करू फॉरवर्डं मेसेज घेऊ बडवून ऊर !! माये मराठी पहा गं प्रेमा आला महापूर ! सोनियाचा दिनू आता नाही राहिला गं दूर !! पोरे पाठवू आमची इंग्रजि माध्यमामध्ये! शिल्लक जागा राहतील मराठीच्या शाळांमध्ये !! याला म्हणतात त्याग खळबळ मनी माजे! मराठी बांधवांसाठी इत्के केलेची पाहिजे!! मेसेजेस इंग्रजीत इंग्रजीत बोर्ड सारे! वाचवण्या मराठीला काहीतरी करूया रे !! शिकू इंग्रजीमधून इंग्रजीमधून बोलू! वाट इंग्रजीची धरू वाट मराठीची लावू !! मराठीला वाचवा हो अशा बोंबा तरी मारू!! मराठीच्या दिनी तरी गोष्टी मराठीत करू ! गड यायला हवाय सिंह नकोय जायला ! जन्मा यावा तानाजी तो पण- दुसऱ
काव्यरस

मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 28/02/2020 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"असुं"या च्या जिद्दीने व्यवहार सिद्ध होतो असूया घर करते सुंदर सत्यास कडवट मानत खुले विनाअट प्रेम पारखे होते कल्पना आणि विचार करा.. एकपत्नी व्रताचे बंधन तोडून राधेकडे पाहिल्या बद्दल .. सीता रामाची अग्नी परीक्षा घेते रेणुका जमदग्नीचा प्राण मागते अहल्या गौतमास पत्थर होण्याचा शाप देते एखादा टिम मेंबर दुसर्‍या टिम मधून प्रेमाने खेळता पझेसिव्ह असुरक्षीत खोलवर जखमा ऐकलेत कधी? ऑनर पनिशमेंट्स ऑनर किलींग्स असूयेने पछाडलेली व्यवहार पूर्णत्वास नेऊनही प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी अप्राकृतिक बंधने अटळच असावित का ?

शेतकी कॉलेजचे दिवस

लेखक बबु यांनी मंगळवार, 25/02/2020 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रा, आपण भेटलो परत पन्नास वर्षांनी या स्नेहमेळाव्यात… आणि आठवणींच्या चित्रांचे रंग परत एकदा ओले झाले... आठवला भाजी-भाकरीचा डबा, आईनं पहाटेच उठून तयार केलेला अन्नपूर्णेच्या मायेनं एसटीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला ... आठवला बिनाका गीतमालाच्या सरताज गीतांचा कल्ला .. कित्येक बुडवून लेक्चर्स , गेलो मॅटिनी शो पाहायला .. आपण सर्वच कुणबीकीचा वसा आठवत लढत होतो ... अडचणींचा गोवर्धन जिद्दीच्या काठ्यांनी तोलत होतो ... आयुष्याच्या संध्याकाळी कृतार्थतेच्या सात्विक भावांनी उजळलेला तुझा चेहरा पाहताना मलाही त्या कृतार्थतेची अनुभूती येत आहे... संकल्प मनोमनी परतभेटीचा करूया...

ग चांदण्यांनो

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 24/02/2020 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नका ग चांदण्यांनो नका येऊ खिडकीत तिच्या मनाचा ठाव सांगा येऊन पडवीत सांगा तिच्या गाण्यात का, आहे नाव माझे? माझ्याविन विरहाचे का, सोसते ती ओझे? ठावे तिलाही आहे का, रात्री कवितांचे येती जथ्थे, जाती स्वप्न गाऊन उद्याचे? आतूर प्रीत आत रोज झुरते उरात सांगा तिला हे सारे चमचमत्या सुरात तिचे चालणे बोलणे भास होऊन छळते लय श्वासांची तेव्हा आठवांशी अडखळते सारे आठव आठव युगांच्या जणू फेऱ्या रेखू पाहती नशीबाला तळहातावर कोऱ्या पसा पसा सुखाचा तिला देईन मोजून बघा चांदणझुल्याचे झोके रितेच अजून जा, जा ग चांदण्यांनो जा करा काम थोडे माझ्या साऱ्या कवितांचे पाडा तिच्यापाशी सडे - संदीप चांदणे (२४/०२/२०१९)

केयलफिड्डी!

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 17/02/2020 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
(नंब्र सूचना: कृपया कवितेचे रसग्रहण आपापल्या मनातच करावे. कवीकडे स्पष्टीकरण मागू नये. कवी मिपावरून हद्दपार होऊ इच्छित नाही. तसेही समझनेवाले अगोदरच कवितेचा अर्थ समझ गये है!) बाई अगदी बावनकशी शिनेमावाणी दिसते जशी काका नेतो तिला डेटवर पिळत पिळत आपुली मिशी कॉफी, गजला, पुस्तकचर्चा काका जाणी जुने बहाणे "वाड्यावरती येइल का ही?" मनात मांडे गुपचुप खाणे बाई परंतू त्यास सवाई ऐकुन हसते चावट कविता फिरुनी सांगे, "सहा वाजले, कन्या थकली वाट पहाता" पर्स उचलुनी भुर्रकन जाते टाळुन त्याची लाडीगोडी हिरमुसलेले काका बसती कुरवाळत मग 'केयलफिड्डी' (पूर्णविराम)

लयीत एका झुलवीत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 14/02/2020 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
लयीत एका झुलवीत -------------------------------- लयीत एका झुलवीत केसांची महिरप काळी गुलाब पांघरुन अंगावरती जाशी कुठे गं सकाळी ? तारुण्याने नव्या तुझ्या झालीस तू बावरी किती जपावं तुला कळेना झाली नजरही भिरभिरी तुझ्या कटाक्षांनी आम्हा वेड लागायची गं पाळी पाहताना तू आमच्याकडे करू नको अनमान तुझ्या नजरेसाठी आम्ही जीव करू कुर्बान गोड अति रूप तुझं फुलांनी भरली डहाळी तुला जायचं तर जा जशी तुझी मर्जी तुझ्या कोमल पायांपाशी आमची एक अर्जी पुन्हा न दिसण्याची शिक्षा लिहू नको ह्या भाळी -------------------------- वॅलेंटाईन डे साठी - बिपीन -----------

कोण कुठली रोहिणी

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 12/02/2020 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगणित आकाशगंगा अगणित सूर्य गगनी अगणित असती धरणी त्यातून कोण कुठली रोहिणी? काय तिचे सुख नि काय तिचे दुःख विश्वाच्या उलाढालीपुढे आहे ते नगण्य काय तिचे हेवे नि काय तिचे दावे एवढ्या भव्य संसारापुढे क्षुद्र ते ठरावे काय तिचे ज्ञान काय तिचे विज्ञान चराचराच्या गूढापुढे नाही त्याला स्थान म्हणूनच नम्र रहावे तिने गर्व नको तिच्या मनी अगणित मानवांमधून एक आहे कोण कुठली रोहिणी - सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस

एका उदास संध्याकाळी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/02/2020 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
एका उदास संध्याकाळी कोणी गात होती विराणी || शब्दांत अशी आस नव्हती चाल नव्हती अशी कोणती धारही नव्हती त्या शब्दांना तरी काळीज जाय चिरूनी || संधीप्रकाश निळा जांभळा खालून गेला वर आभाळा कुंद हवा अन वारा पडला हवेत सूर राही भरूनी || धिरगंभीर सूर कवळूनी गीत हृदयीचे आळवूनी उलगडे आर्त सरगम भरूनी राहिली कानी || - पाषाणभेद ०५/०२/२०२०