Skip to main content

पालखी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 30/10/2008 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८ 'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी? आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी
लेखनविषय:

वाचने 3731
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी क्या बात है..! या ओळी क्लासिक आहेत..! अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :) आपला, (मिपाकर) तात्या.

आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी अतिशय सुरेख.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..! असो, मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..! (मिपाकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केवळ वे़ळेअभावी मागे पडते आहे याचा खेद आहे. (आंतरजालीय)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केवळ वे़ळेअभावी मागे पडते आहे याचा खेद आहे. चालायचंच..! :) (समजूतदार!) तात्या.

कविता/गझल संपुर्ण आवडली. :) आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी हे तर सुंदर झाले आहे .:)

कविता/गझल संपुर्ण आवडली. :) आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी हे तर सुंदर झाले आहे .:)

कविता वाचली. बेसनलाडूंच्या कवितेमधे वृत्तादि बाबींमधे बोट दाखवायला जागा नसते , कवितेच्या शुद्धतेबद्दलची मूलभूत तत्त्वे त्यांची कधी चुकत नाहीत. या वृत्तबद्ध रचनेच्या बाबतीत ते आपल्याला लौकिकास जागलेले आहेतच. कवितेच्या आकलनाच्या आणि रसास्वादाच्या बाबतीत थोडा गोंधळात पडलो आहे. एकेक पंक्तिद्वय हे आपापल्यामधे अर्थपूर्ण आहेत; परंतु कवितेचा एकसंध परिणाम असा (मला ) जाणवला नाही. या दृष्टीने, कविच्या मनात , ही एक गझलसदृष्य रचना असावी का काय असे मला वाटले. तसे असल्यास शार्दूलविक्रीडीतात (बरोबर ना ?) बांधलेली कविता, पण परिमाण गझलेचे असे काहीतरी काँबिनेशन माझ्या मनात झाल्याने माझा गोंधळ उडाला. आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी या सर्व पंक्ति अतिशय आवडल्या ! मनसोक्त दाद द्याव्यात अशा !

In reply to by मुक्तसुनीत

वर्गीकरणात 'कविता' असे दिसत असले तरी ही शार्दूलविक्रीडितातली एक गझलच आहे. अर्थात, प्रत्येक द्विपदी एक स्वतंत्र कविता हा परिणाम त्या ओघाने आलेलाच आहे. त्यामुळेच एकसंध, उलगडत जाणारी अशा स्वरूपाची ही 'कविता' नाही. रदीफ (कायम राहणारे अंत्ययमक) दिसत नसल्याने गझलेचा विशिष्ट आकृतीबंध दिसत नसेल; आणि त्यामुळे ही 'गझल नाही' किंवा 'गझलसदृश कविता आहे' असे वाटायची शक्यता आहे, पण ही 'गैरमुरद्दफ' म्हणजे रदीफ नसलेली अशी गझल आहे. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

काय सुरेख लिहलस बेला. कविता पाझरायला वेळ मिळाला तर शेवटी. अजुन येउदे भावड्या. >>तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी मस्त !! - (++आनंदित) आंद्या