आजीची काठी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आजी, आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न
आजाला सांगते.
चिमुकल्या तानुला
स्वप्न पडे पाहाटेला
आजी आणि काठी
एकमेकांशी बोलताना
काठी म्हणे आजीला
नको सोडू कधी मला
संगतीत राहून तुझ्या
महत्व आलेच मला
आजी सांगे काठीला
नकोच घालू गळ मला
इतक्या वर्षाच्या सोबतीने
आला कंटाळा तुझाच मला
ऐकून त्यांच्या संभाषणाला
म्हणे तानु स्वत:ला
स्वप्नांत का असेना
पाहीन माझ्या आजीला
काठीवीना चालताना
श्रीकृष्ण सामंत
वाचने
1536
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
शेवट एकदम गोड झाला आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वा..