मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द्विधा मनाची....

पारोळेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एकाकी भटकतोय या अनोळखी दुनियेत सोबतीला नाही कुणी या एकेरी वाटेत... दिसत होतं लांबच लांब आकाश दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण दिसत होतं एकच झाड त्याची होती आकाशाकडे मान माझ्यासारखीच द्विधा त्याची ही खंत होती मनात माझ्यासारखं असू नये कोणी हीच प्रार्थना करतो सद्गुरू चरणात रेटता रेटता... दिसलं एक विसाव्याचं ठिकाण जाऊन पाहतो तर काय? माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान तेथून जावं की थांबावं हाच होता प्रश्न मनात कुणी मिळेल जीवाभावाचं या अनोळखी जगात....

वाचने 1641 वाचनखूण प्रतिक्रिया 4