मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निःशब्द होता सारा परिसर

श्रीकृष्ण सामंत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-रिझवी) जहाली असता अर्धी रात्र निःशब्द होता सारा परिसर दाहलेल्या मनाची ऐका रंजलेली ही नीतिकथा धुमसलेले उश्वास येती वणव्यातून चांदण्या सांगती डोळे मिचकावून लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल नसे तसे काही जाहले त्या धरतीवर गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर सांगती चांदण्या प्रवाही होण्या सागराला जलधारा ओसंडण्या सांगती त्या मेघाला सांगे चंद्रमा जेव्हा आग लागे हृदयाला अश्रूंच्या जलधारा विझवीती त्या आगीला श्रीकृष्ण सामंत

वाचने 1456 वाचनखूण प्रतिक्रिया 3

राघव Wed, 10/29/2008 - 15:30
आबा, कल्पना चांगली आहे. मूळ काव्य ही येथे टाका की. म्हणजे त्या दृष्टीने कवितेकडे बघता येईल. कारण कल्पना चांगली असूनही कविता पकड घेत नाहीये असे वाटले. मुमुक्षु

In reply to by राघव

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 10/30/2008 - 05:38
मुमुक्षु, कवितेची कल्पना आवडली हे वाचून आनंद झाला. "म्हणजे त्या दृष्टीने कवितेकडे बघता येईल. कारण कल्पना चांगली असूनही कविता पकड घेत नाहीये असे वाटले." मूळ कविता मी तुला खाली देतच आहे.तुझ्या आग्रहामुळे.पण अनुवादीत कवितेच्या बरोबर मुळ कविता न देण्याचा माझा पायंडा आहे. आणि त्याचं कारण असं की. १- मूळ रचनां दिल्यावर अनुवादित रचनेचा charm कमी होईल असं तुला नाही का वाटत? २-कधी कधी अनुवादीत केलेल्या काही प्रसिद्ध गाण्याची आठवण,अनुवादित रचना वाचताना कळत नकळत होत राहीली तर मजा नाही का येणार? (असंच एका वाचकाच्या आग्रहावरून मी नंतर त्यांना मुळ कविता दाखवली.आणि ते मला म्हणाले, "मुळ कविते पक्षां आपला अनुवादच चांगला वाटला" हे वाचून मला जरी बरं वाटलं तरी ज्याची कल्पना घेऊन मी कविता लिहिली त्याच्या बद्दल वाईट वाटलं अर्थात "व्यक्ती तशा प्रकृती" म्हणा.) आता एक उदाहरण देतो. "हा चंद्रमुखी चेहरा केसाचा रंग सुनेहरा हे नीळसर नीळसर डोळे हे लक्षण असे वेगळे तारिफ करू का त्याची कलाकृती ही ज्याची" ही माझी अनुवादित रचना तू वाचून पहावी.हे कोणतं मूळ गाणं आहे हे आपलं आपल्याला समजल्यावर (हुडकून काढल्यावर) नक्कीच आनंद होईल असं मला वाटतं. हे "काश्मीर की कली"ह्या चित्रपटातलं गाणं आहे. "ये चांदसा मुखडा तेरा ये जुल्फोका रंग सुनहरा ये नीली नीली आंखें …..वगैर,वगैरे." काही गाणी तितकी प्रसिद्ध नसतात त्यामुळे मूळ रचना देवून वाचकाला (अनुवादित) कविता वाचतानाचा मजा कमी येईल असं मला वाटतं "यादे माझी आहेत तुझ्याजवळी श्रावणमासी ओलेते दिवस मात्र अन माझ्या कोऱ्या कागदावरची लिपटलेली ती काळोखी रात्र जा विसरून ती यादे या क्षणी अन परतव माझ्या त्या आठवणी" हा एका प्रसिद्ध गाण्याचा अनुवाद, "परतव माझ्या आठवणी" असं शिर्षक असलेली माझी कविता वाचून तू मूळ गाणं अवश्य (हुडकून) शोधून काढ. तूला आनंद होईल असं मला वाटतं.आशा भोसले हे गाणं गातात आणि संगीत रचना R.D.Burman याची आहे.एव्हडीच hint देतो. "बुगडी माझी सांडली गं जाता सातारला" हे गाणं कवी माडगुळकर यांच.त्याचा अनुवाद एका हिंदी गाण्यात केला गेला. "झुमका गीरा रे बरेलीके बाझार मे" हे मला अलिकडेच कवियत्री शांता शेळके यांच्या तोंडून "नक्षत्राचे देणे" ह्या कार्यक्रमात ऐकायला मिळालं. अर्थात अनुवाद म्हणजे word to word copy नसतं म्हणा. आता इथे मुळ कविता देत आहे. चित्रपट सुरंग,कवी शेवन रिझवी. गुज़री थी रात आधी खामोश था ज़माना जलते हुए दिलों का सुन ले ज़रा फ़साना गुज़री थी रात आधी उठी जो आह धुआँ बनके आशियानों से सितारे झाँक के बोले ये आसमनों से धुआँ ये कैसा है देखो लगी है आग कहीं चलो घठाओं से कह दें कि जल रही है ज़मीं गुज़री थी रात आधी... ये शोर चाँद भी तारों का सुन रहा था कहीं लगा इशारों से कहने नही ये बात नही ज़मीन पर जो बेचारे गरीब बसते हैं घमों कि आग मे ये दिल उन्ही के जलते हैं गुज़री थी रात आधी.. मला वाटतं तू ह्याचा अनुवाद कसा करशील त्याचं मला कुतुहल आहे.प्रयत्न तरी करावास. एक सांगायचं राहून गेलं. "घमों कि आग मे ये दिल उन्ही के जलते हैं" ही ओळ मी मुद्दामच " घामाच्या दाहाने"(काम करून करून झालेल्या परिश्रमाने) या अर्थाने फरक करून लिहिली.कविला "घमो" म्हणजे "ग्वम" म्हणजे "दुःख " म्हणायचं आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com