Skip to main content

कविता

अमृताच्या धारा

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 24/06/2009 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
झाली शांत तृप्त धरा अशा बरसल्या धारा सांगे गंधाचा निरोप तुझ्या अंगणीचा वारा गर्द सावळे आभाळ राशी रुप्याच्या सांडते सौदामिनी उजळते तुझा गगनगाभारा झेलताना तनूवर हिरेमोती आनंदाने लाख डोळ्यांनी फुलतो मनमोराचा पिसारा तुझ्या करुणेचा मेघ माझ्या दारी झरताना जागेपणी पापण्यांत स्वप्न येतसे आकारा माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा
Taxonomy upgrade extras

अश्वत्थ

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 24/06/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कोरड्या डोळ्यात आता नुरला विश्वास शांत घरातली भासे खिन्न ओसरी उदास झाले कवाड पोरके नाही अंगणाची साथ चुडा भरल्या हातात बूजगावण्याचा हात अश्वत्थाच्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी पारावर हिंडणारी बघ साळुंकी एकटी खोली भरून दाटला खुळा अंधाराचा जीव बाहेरचा कव डसा शोधी जमिनीचा ठाव वारा झपाटून आला होई क्षणात बेभान स ळ स ळू न उठते पिंपळाचे पान पान

पहिला पाउस

लेखक जागु यांनी मंगळवार, 23/06/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाउस बालमनाचा कागदी होडया वल्हवण्याचा बेडका मागे धावण्याचा डबक्यामध्ये डुंबण्याचा आईच्या कोरड्या पदराचा ओला स्पर्श ममतेचा. पहिला पाउस तरुण मनाचा मस्ती - मौजेच्या झर्‍याचा स्वप्नाच्या कोवळ्या पालवीचा प्रेम धाराना अंगावर झेलण्याचा प्रितीमध्ये न्हाउन निघण्याचा पहिला पाउस वृद्ध मनाचा ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा कांदा भजी अन गरम चहाचा वाकड्या दांड्याच्या घत्रीचा आठवणींच्या पागोळ्यांचा
Taxonomy upgrade extras

-: माझे कौलारू घर :-

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 22/06/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
-: माझे कौलारू घर :-

खाली आहे हिरवळ हिरवी
दोन बाजूंनी डोंगर कडे
उंच बघावे आभाळ निळे
सोनेरी सुर्यकिरण त्यातून पडे ||
Taxonomy upgrade extras

स्वर्ग

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 22/06/2009 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज मंद वार्‍यातुनी वाजते बासरी सख्या हाय गात्रांतुनी धुंद ही शिरशिरी निरवताही डोलते वारियाच्या सवे तुझ्या स्वरांसवे धरा छेडिते सतारी रंग सृष्टीचे बघ जाहले कृष्ण निळे अन व्योमात सामावूनी उरला श्रीहरी हरिच्या सुरांतुनी मनी प्रित झिरपते तयांसवे डोलते मुग्ध राधिका लाजरी खुळावल्या गोपिका रास वृंदावनी जिभ वेडावूनी बघ चिडवितो मुरारी अंतर गगनधरेतले गेले विरघूनी चांदण्यात अवतरे स्वर्ग यमुनातीरी विशाल

तू

लेखक ज्ञानदा कुलकर्णी यांनी सोमवार, 22/06/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
'तू' एक कोडे अत्यंत क्लिष्ट, अवघड असे.. 'तू' एक गूढ सत्य कधीही न समजणारे.. 'तू' एक साठा वेदनेचा, दु:खाचा, सहनशीलतेचा.. 'तू' पाण्यासारखा सर्वात मिसळणारा... 'तू' सागरासारखा सर्वांना सामावून घेणारा.. 'तू' माझा मित्र मला समजून घेणारा.. 'तू' माझा भाऊ माझे लाड करणारा... 'तू' माझा बाबा माझी काळजी करणारा.. मला सांभाळून घेणारा... माझ्यासारखाच ...... 'तू' माझा बाबा....
Taxonomy upgrade extras

कारण

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 20/06/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याचा अर्थ नेमका काय असावा? केवळ दडपण? की नियतीच्या उंबरठ्यावर छिन्न जिवाचे आत्मसमर्पण? मी वाकावे, मीच झुकावे, मलाच मी घालावे कुंपण अन् माझे सर्वस्व लुटावे, जपण्यासाठी तुझे थोरपण किती जपू मी? किति सांभाळू? तुझ्या मनाचे दुभंगलेपण मनात काही, जनात काही, कृत्रिम अन् फसवे मोठेपण तपे लोटली तरी न कळले माझ्या अगतिकतेचे कारण तुझा आंधळा अहंकार की माझे अतिरेकी हळवेपण?
Taxonomy upgrade extras

फसवणूक

लेखक अ-मोल यांनी शनिवार, 20/06/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ अगदी कोरं करकरीत तू पाठवलेले ढग रिते होवून उलटून गेले असतील बरेच दिवस. पुढयातल्या कागदासारखं मनावरही उमटत नाहीत तुझ्या पावसाची अक्षरं. दाही दिशांना नजरेचे घोडे फेकून पहावं ३६० अंशांत एखादाही चुकार ढग नाहीच. निळा कॅनव्हासही ओकाबोका. विहिरीत उतरावं खोल खोल तर सगळे सांदी कोपरे व्हॅक्युम सकरने शोषलेले. आता खणायचीही भीती वाटते न जाणो तिथलंही पाणी अंतर्धान पावलेलं असेल? बारोमास दुष्काळ की काय ? असं स्वत:ला विचारतानाच ओल्या मातीचा गंध मनात आणि मी सचैल स्नात... स्वत:लाच किती फसवावं माणसानं?
Taxonomy upgrade extras

कोडे

लेखक जागु यांनी शनिवार, 20/06/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे उभ्या - आडव्या मार्गाचे काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे आडव्या मार्गाने पुढे जायचे तर उभ्या मार्गाने झेप घ्यायचे काळे चौकोन मात्र वगळायचे कोडे आपणच सोडवत रहायचे यशासाठी प्रयत्नांत झुरायचे मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.
Taxonomy upgrade extras

सुख एक पाखरू

लेखक जागु यांनी शनिवार, 20/06/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या पुष्पी अलगद येउन मधुआत्म्यास निर्मळ आनंद देतो त्या पाखरास आम्ही सुख म्हणतो पिंजर्‍याचे ह्याच्या मोकळे छप्पर पाखरू हे अवखळ चंचल गाव ना ठाव हिंडे निरंतर करीतो हा चोख व्यवहार देवाण घेवाण भर नफ्यात अपघातात विम्याला नसे भार कधी ह्याची उंच भरारी कधी विश्रांतीस पानाआडी विहार ह्याचा त्याच्याच मर्जी
Taxonomy upgrade extras