शहरात लागलेली वाट
धन्याशेठची 'शहरात धावणारी रानवाट' ही वेगळीच कविता वाचली, आवडली. आता वेगळं काही वाचलं, आवडलं किंवा नाही आवडलं तरी आमचं चक्र चालू होतंच त्याप्रमाणे ते झालं! ;)
शहरात लागलेली वाट
-----------------
'बघायचा' गॉगल लावून
चकाचक केशकर्तनालयातून
पळतो मी लगेच बाहेर
एका हमरस्त्यावर.
उजवीकडे, डावीकडे
नट्यांची पोस्टर्स,
डोळे तनांनी झाकोळतात!
धसमुसळ्या तरुणी
दृष्टीआड जातात,
खुसफुसतात, खिदळतात.
एक पोरटी आडवी जाते बटांशी खेळत.
लगबग चालणार्या
रंगीबेरंगी फुललेल्या
मादक भडक वासांच्या
सुकेशा ललनांमधून
वाट काढतो, न थांबता.
मग अचानक थबकतो.
दत्त समोर वाटेत
दोन झुडपे असतात
दरवळत शनेल नंबर फाइव्ह
आणि ओल्ड स्पाईस.
त्या अरुंद फुटपाथवर
तंद्रीतच मी ऐकतो -
"अहो काका, अहो काका -
हा वीग तुमचा का?"
-------------------------
चतुरंग
याद्या
4712
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
हा हा हा
हे हेहे
लय भारी
अरे वा मस्तच..
हा हा हा
हाहाहा.. वि
:)
+१
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंगा भाई
एकदम मजेदार
हे हे हे ..
मस्त
हाहाहाहा...
रंग्या सुटला
हा हा
भारीच भारी!
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
त्या अरुंद
खी: खी: खी: -