Skip to main content

तू असता तर..

लेखक पद्मश्री चित्रे यांनी बुधवार, 17/06/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
तू असता तर झाले असते जीवन सारे मंद सुगंधित क्षणा-क्षणाला फुलला असता ओला श्रावण नवीन धुंदीत तु असता तर झाले असते पायतळीचे काटे तृणवत उदासलेल्या धुक्यामधुनी उब तुझी ही असती घेरत तु असता तर मी ही असते- अशीच, तरीही वाटत रहाते तू नाही तर मी ही आता अशीच असते, कुठेच नसते
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2286
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

तु असता तर मी ही असते- अशीच, तरीही वाटत रहाते तू नाही तर मी ही आता अशीच असते, कुठेच नसते अत्यंत तरल, आर्त भावना! सुरेख कविता. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

तू असता तर झाले असते जीवन सारे मंद सुगंधित क्षणा-क्षणाला फुलला असता ओला श्रावण नवीन धुंदीत हे सर्वकाय द्येवबाप्पाने निर्मान केलय. तेचासाठी दुसर्‍या कोनाची काय गरज. आनी तो मानुस नस्ला तर काय फरक पडतो काय. आपन आप्ला आप्ल्या जिवनाचा आनंद घ्यायाचा. कोनासाठी खोलंबायच नाय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

फुलवा नेहमीसारखीच अत्यंत सुरेख सुंदर कविता !! येउदे अजुन .. वरच्या रास्कल लोकांकडे लक्ष देउ नकोस. नावातच भुषणाने रास्कल म्हणवतात स्वतःला ते. काहीतरी वैगेरे म्हणतात तर औकाद असेल तर लिहुन दाखवावे .. या किंवा कोणत्याही स्वत:च्या आयडीने त्यांनी. चिप साले.

In reply to by आनंदयात्री

म्हनाय्चाय माला कि आपन उगाचच दुस्र्या मान्साला जादा भाव द्येतो आनी त्या मान्साने आप्ल्याला सोडुन दिल कि दुख्ख करत र्‍हातो. आप्ल्या जिवनाचा आनंद आपन दुस्र्यावर आवलंबुन का बर ठेवाय्चा? */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

सगलच नाय कलल मला पन थोड कलल त्यावरुन सन्गते चान आहे..... आनि काय हो प्रेमत लोक आन्धले होतत हे खर आहे.....हे जे लोक पदतत त्यानच कलेल नहि का..... आसो............ आपन आपल बिन्दास कविता करा.....आजुन स्टॉक येउ द्या जरा.....

छान कविता... फुलवा ताई बर्‍याच दिसान आपण काही लिहल आहे. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

कविता आवडली.

खुपच छान, स्पेशली शेवटचे कडवे एक नंबर आहे. -निखिल

मस्त. शेवटचं कडवं भाव खाऊन जातंय!! :) येऊ देत अजून. अवांतरः बर्‍याच दिवसांनी तुमचं लेखन दिसलं!! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )