शहरात धावणारी रानवाट
लेखनविषय:
शहरात धावणारी रानवाट
-------------------------
धावायचे बूट घालून
टोलेजंग इमारतीतून
पडतो मी लगेच बाहेर
एका पायवाटेवर.
उजवीकडे, डावीकडे
विराट वृक्षराज
ऊन झळा झाकोळतात.
धसमुसळी जनावरे
दृष्टीआड धावतात,
धुसफुसतात, खिंकाळतात.
एक खारोटी आडवी जाते.
हळूहळू हलणार्या
रंगीबेरंगी फुललेल्या
मादक रानटी वासांच्या
झाडीजाळीमधून
वाट काढतो, न थांबता.
मग अचानक थबकतो.
दत्त समोर वाटेत
दोन झुडपे असतात
दरवळत शनेल नंबर फाइव्ह
आणि ओल्ड स्पाईस.
त्या अरुंद फुटपाथवर
तंद्रीतच मी म्हणतो -
"अहो ताई, अहो दादा -
देता का जरा जागा?"
-------------------------
वाचने
4964
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
रोचक
In reply to रोचक by मुक्तसुनीत
एव्हढे
मस्त
सही!
मस्त !
मस्तच.
छान कविता!
वेगळ्या उपमा -पण
वेगळीच कविता..
कविता आवडली
छान कविता
वा! मस्त!!
छान
वा ..
संमिश्र
सर्वांचे आभार
इंग्रजी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to इंग्रजी by नंदन
+ १ हेच म्हणेन!
In reply to इंग्रजी by नंदन
अधिक नेमके शब्द
इंग्रजी कविता जास्ती आवडली.
इंग्रजी कविता
काही ध्वनिफिती
In reply to काही ध्वनिफिती by धनंजय
मराठी हेल
खास