Skip to main content

कविता

शहरात धावणारी रानवाट

लेखक धनंजय यांनी बुधवार, 17/06/2009 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
शहरात धावणारी रानवाट ------------------------- धावायचे बूट घालून टोलेजंग इमारतीतून पडतो मी लगेच बाहेर एका पायवाटेवर. उजवीकडे, डावीकडे विराट वृक्षराज ऊन झळा झाकोळतात. धसमुसळी जनावरे दृष्टीआड धावतात, धुसफुसतात, खिंकाळतात. एक खारोटी आडवी जाते. हळूहळू हलणार्‍या रंगीबेरंगी फुललेल्या मादक रानटी वासांच्या झाडीजाळीमधून वाट काढतो, न थांबता. मग अचानक थबकतो. दत्त समोर वाटेत दोन झुडपे असतात दरवळत शनेल नंबर फाइव्ह आणि ओल्ड स्पाईस. त्या अरुंद फुटपाथवर तंद्रीतच मी म्हणतो - "अहो ताई, अहो दादा - देता का जरा जागा?" -------------------------

पावसाला विनंती

लेखक राजा यांनी मंगळवार, 16/06/2009 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाला विनंती
अरे अरे पावसा, तू पड भसाभसा तू पड भसाभसा वेडा झाला बळी राजा नको देऊ त्याला सजा वर पहाता पहाता, जीव झाला रड्कासा तू पड भसाभसा का रुसला आम्हावरी ? तुझ्याविना कोण तारी सा~या सजिवांचा देव, तुझ्यावरच भरवसा तू पड भसाभसा पुर्वी तानसेन राग म्हणायचा धो धो पाऊस पडायचा तु नाही पडला तर, सुर गवसेल कसा तू पड भसाभसा नद्या नालेही ओसरली तळे सुध्दा खाली झाली गुरं ढोरं वेडी झाली, जसा पाण्याविणा मासा तू पड भसाभसा तुझ्या विणा शेती नाही शेती विणा काम नाही पाण्याच्या
Taxonomy upgrade extras

ठसे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/06/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुख माझे कसे, मलाच महाग झाले सोसवेना विरह , मन पिसे झाले जपले आजवरी मी, गे कसे हरवले अश्रु आज माझे, शुष्क कसे झाले वेदना मनीची नच, जाणिली कुणी भावनांचे आज, माझ्या हंसे झाले डोळ्यात साठलेले, प्रेम लुप्त झाले तुझे टाळणे मला, नित्य असे झाले आता आठवांचेही, वार दुधारी झाले शब्दांवर वेदनांचे, विकल ठसे झाले विशाल

अमृत धारा

लेखक जागु यांनी सोमवार, 15/06/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षेत जीव हा दाहला विसंबली तुजवर जीवनमाला तुजविन हर जीव अधुरा आकाशी फाकल्या निल धमन्या डोंगरी आगी वाचुन वणवा सिंधू, तलावाची महानता पणाला घाल धाव बरसत जीवन धारा अधिर धरती तुज स्पर्शाला तुज संगच्या ओलपणाला गुदमरे अंकुर बी प्रसुतीला पशू पक्षी घालती कोरड ताना वृक्षे आतूर गार पल्लवीला ये रे बरसत अमृत धारा.
Taxonomy upgrade extras

आठवण..

लेखक jenie यांनी सोमवार, 15/06/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळी डोळे पाणावले, आज तूझ्या आठवणींनी खुणावले.. कोणी देईल का ते क्षण मंतरलेले, दिवसांतरि जे ह्रदयात जपलेले.. पण , क्षणही नाही राहीले पूर्वीसारखे, क्षणोक्षणी रंग बदलती माणसांसारखे.. तूझ्या नी माझ्यात आता न काही पाश राहीलेले, जपते मनात माझ्या आपण एक स्वप्न पाहिलेले...
Taxonomy upgrade extras

तुमचे स्वागत आहे....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 15/06/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचे स्वागत आहे.... खरच, वय काय असते? एक नंबर, १८-२०-४० वर्षे.. मग त्यावरुन ठरते सज्ञान कि अज्ञान मतदान केंव्हा करायचे. लग्नास वय योग्य कि अयोग्य? मरायच वय किति.... वेळ..एक भ्रम आमच्या कडे बघा.. आम्हाला कुठलेच नियम लागु नाहित... बंधन नाहि आम्हाला, वय, वेळ, काळाचे... आम्हि मुक्त आहोत.. या आमच्या दुनियेत... तुमचे स्वागत आहे.... अरे घाबरलात...???हा हा हा... [घाबरुन काय होणार??? आज ना उद्या यावेच लागेल] [आधारित] ------------------------------------------- अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

बालमजूर

लेखक जागु यांनी सोमवार, 15/06/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
हाय नशिबा माझी कहाणी बालमजूर मी, बाल्यावस्थेची समाधी बापाची माया लुटली जुगारी मायची मारझोड उघड्या नजरी आक्रंदती काळीज ममतेसाठी ममताही मायची दव्यातच उरली तिन्ही पोटचा मी भार वाही देवही ना प्रसन्न उपाशी पोटी शिक्षण ना चव हलव्याची मालकाच्या लाथा अन तुकडा पदरी कोवळे शरीर चिकटतसे सापळी लाल रक्त जळून भिने काळ्या रंगी खेळ, बागडण्यास ना त्राण अंगी मायच्या जखमेची चिंता सदा उरावरी.
Taxonomy upgrade extras

मी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 15/06/2009 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
मज वाटे धर्म मी संस्कृतीचे मर्म मी कथिले भगवंताने ते वांछित कर्म मी मज वाटे मूळ मी कर्तव्याचे फुल मी टिपलेली धरित्रीने पाचोळ्याची धूळ मी मज वाटे चंद्र मी मार्तंड तो सुर्य मी जपणारे अंध धर्मा आततायी शौर्य मी अस्मितेचा विचार मी अतिरेकी आचार मी जोपासतो मतांधता अभिमानी विकार मी स्वत्व मी, संस्कार मी फसलेला आकार मी सरलेले ते द्वैत सारे उरलो निराकार मी विशाल

पाऊस

लेखक रामदास यांनी गुरुवार, 11/06/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हटवादी पोर हुंदके दाबत, जिन्याच्या पायरीवर बसावं असा पाऊस. पोळलेल्या हातानी घ्यावा कसा कडेवर.? ------------------------------------------------------------------------------------------------------ पाऊस भरतुकडा नादान साजण . कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का?
Taxonomy upgrade extras

मथुरानगरपती

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 11/06/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
हे कृष्णार्पण इथे! मथुरानगरपतीनं लावलेलं वेड इतकं जबरदस्त आहे, की कधी नव्हे तो काव्याचा काव्यात स्वैर भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय. जमलाय की नाही, ते त्या मथुरानगरपतीलाच माहीत!