९ ऑगस्ट -- "क्रांती दिन "
उंच उभारुनी ध्वजा केशरी
जयजयकार निनादु दे |
पेटलेल्या संगराची
ज्योत गगनाला भिडू दे ||
सामोरी येथ आमुच्या
लोहपाशात बद्ध देवता
थेंब तिच्या अश्रुचा
धगधगती ज्वाला बनू दे ||
आव्हान असे दश-दिशांना
अजिंक्य आमुची विजिगीषा
बेभान अनावर आवेगाला
साथ धैर्याची मिळू दे ||
तळपति तेज दामिनी
उसळू द्या आवेशाने
अर्ध्य उष्ण रुधिराचे
तेजाला त्या अर्पू दे ||
उभा पुढे जरी काळ राही
नसे तमा आम्हा जराही
मत्त , उन्मत्त अहंकाराला
धाक शौर्याचा असू दे ||
पाप नाचते उन्मादाने
धुंद होत आपुल्या बळाने
अमानुष त्या क्रौर्याचा
नाश पुण्याला करू दे ||
धुमसत राही आग अशी
रण भूमीच्या -हुदयांतरी
उधळुनी प्राण पुष्पे ही
गीत अभिमानाचे स्फुरु दे ||
याद्या
4690
प्रतिक्रिया
12
लेखनविषय:
मिसळपाव
भारीच....
छान
छान
पाप नाचते
एक उच्च
सहमत.
खूप छान
समयोचित काव्य
छान!
कविता आवडली
जय हो!!
तथास्तु!