Skip to main content

हवे कुणाला...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/01/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
********************************* हवी कशाला रित पुराणी हवे कुणाला प्रश्न नवे... जुनेच अपुले घाव बरे.., अन वर्तमानाचे सुत्र हवे...! हवे कशाला क्षितिज सारे, हवी कुणाला धरा नवी.., तुजपुरती मज चाकोरी बरी, अन तुला जाणीव हवी ...! हवे कशाला पाश जुने... हवे कुणाला स्वप्न सवे, याद तुझी तरीही उरी.., वळुन पाहण्या कारण नवे...! हवे कशाला स्वर्ग साती... जगण्या कुणाला निमित्त हवे, एक तुझी ती मिठी खरी.., सय तुझी अन उरात हवी..! ****************************** विशाल.
लेखनविषय:

वाचने 1226
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हवे कशाला क्षितिज सारे, हवी कुणाला धरा नवी.., तुजपुरती मज चाकोरी बरी, अन तुला जाणीव हवी ...! कवितेमधून 'तुझ्याभोवती' रिंगण छान घातले आहे.

हवी कशाला रित पुराणी हवे कुणाला प्रश्न नवे... जुनेच अपुले घाव बरे.., अन वर्तमानाचे सुत्र हवे...! मला वरील ओळी आवडल्या ..! -दिलीप बिरुटे [जुन्याच घावांनी बेजार]