Skip to main content

सोनपावले ही तुझी...

सोनपावले ही तुझी...

Published on 13/01/2010 - 10:44 प्रकाशित मुखपृष्ठ
सोनपावले ही तुझी... काळे ढग नैराश्याचे होते जीवनात माझ्या. हर्ष घेउनिया आली सोनपावले ही तुझी. होतो एकटा प्रवासी वाटेवरी या जगाच्या. आली वसंत घेउनी सोनपावले ही तुझी. अंधारात या निशेच्या डोळे शोधती प्रकाश. झाली मंगल प्रभात सोनपावले ही तुझी. होतो प्रेमाच्या शोधात मरुभुमीत वैराण. झाले मृण्मयी किनारे सोनपावले ही तुझी.
लेखनविषय:

याद्या 1208
प्रतिक्रिया 3

आली वसंत घेउनी सोनपावले ही तुझी. कवितेचा आशय छानच आहे. तरी सुचवावे वाटते म्हणून- आली सोबत होउनी सोनपावले ही तुझी.

In reply to by विदेश

आली वसंत घेउनी सोनपावले ही तुझी. परफेक्ट... या ओळी त्या कडव्यासाठी एकदम योग्य आहेत. धन्यवाद मित्रा...

झाले मृण्मयी किनारे सोनपावले ही तुझी. मस्तच binarybandya™