एकही अक्षर...
एकाएकी कुठून कैशी
कल्लोळातुन उमटे ऐशी
हीन स्वरांची शुभ्र रेष ती
अजाणत्या त्या विहरी वेली
क्षत्रपतीच्या कुरणावरुनी
रविकुहरातील बनुनी छाया
सरसावुनी मग येई रावा
मरुभूमीकणघृत रगडाया
जराजीर्ण त्या जरासंध-सम
लचके समस्त एकवटाया
नाद जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा
ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा
शब्दार्थ -
विहरी - विहरण करतात
क्षत्रपती - पृथ्वीपती
घृत - तेल
प्रतिपदमात्रे - (कवितेच्या) प्रत्येक ओळीत
मिसळपाव