मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेरंग होळी!!

निमिष सोनार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आली रंगीबेरंगी होळी पण झाली आहे महाग पुरणपोळी झाल्या महाग तांदूळ अन डाळी महागाई सर्वांचे कानपीळी रिकामीच आहे सामान्यांची झोळी... आली रंगीबेरंगी होळी पण आहे मनी दहशतीची भिती काळी नेत्यांची राजकारणी खेळी जातो जनतेचा बळी कधी सरेल दहशतीची रात्र काळी...?

वाचने 1692 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 01/03/2010 - 09:42
होळी आवडली बरं का ! :) बाकी, रंगीबेरंगी शब्दामधून आम्ही आनंदाच्या छटा शोधत होतो. :) -दिलीप बिरुटे

अनामिका 01/03/2010 - 14:47
क्ष-सो ! कवितेचे शिर्षक "बेरंग होळी" असे केलेत तर जास्त बरे. असो सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी कविता आवडली "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

निमिष सोनार 01/03/2010 - 16:42
शिर्षक बदलवले आहे. सूचवल्याबद्दल धन्यवाद. पण, मूळ कवितेत मात्र , "आली रंगीबेरंगी होळी" असेच वाक्य आहे, आणि- त्याखाली वाक्याआधी "पण" शब्द टाकला आहे. म्हणजे अर्थ अधिक गडद होतो. धन्यवाद.