मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोहम

वर्षा म्हसकर-नायर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आता रोजच यावसं वाटतं तुझ्याकडे, तसे तुझ्या माझ्यामधिल आस्तित्वाचा शोध मला माझ्या जन्मापसुनच लागला, पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते, माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तुझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस एरवी तुझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली. तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे पण तरिही वेडं मन तूला माणसात शोधायला जाते तुला शोधित शोधित मी मृगजळापाठी वेडयासारखी धावते आणि धावुन धावुन थकले कि पुन्हा तुझ्याकडे येते तू सवयीप्रमाणे पुन्हा मला तुझी शितल छाया आणि अथांग प्रेम देतोस आणि म्हणतोस वेडे "तुझ्यातच आहे मी आणि तू मला शोधित इतकी धावलीस?" खरंच, मी आहे मन.. अतृप्त, आसक्त, तुषार्त आणि तू आहेस माझा आत्मा... अमुर्त, निराकार तरिही शाश्वत, सच्चा.

वाचन 1494 प्रतिक्रिया 0