Skip to main content

कविता

स्वप्नी माझ्या आलीस तू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी माझ्या आलीस तू
स्वप्नी माझ्या आलीस तू हळूच हसून लाजलीस तू कितीक दिसांनी झोप आली मला जागेपणी विसरलो जगाला न दिसे दुसरे काही दिसशी मजला तू रात्र माझी धुंदीत आली वेड्या मनाला समाजावून गेली स्वप्नाच्या वाटेने जातांना वाटेत भेटलीस तू होईल माझे स्वप्न का खरे भेटून सगळे सांग मला बरे विसरू नको आता काही प्रितीचे शब्द बोल तू - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०७/२०१०
काव्यरस

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा राहीला सीमाभागी वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ|| दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे विचार नको करू, नको मनामधे झुरू समजू नको अभागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१|| आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू जरी लाठ्या डोक्यास लागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२|| जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल झालो मोठे त्य
काव्यरस

काही राहीलेले

लेखक पंचम यांनी सोमवार, 12/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काही राहीलेले....span> ते सर्व राहीले मागे जे काट्यात उमलले होते... फक्त पाकळ्या हातात गंध श्वासात राहीले होते... मी शोधल्यात ज्या मातीत काही ओळखीच्या पाऊलखुणा त्या मातीत जणू आता आभास राहीले होते..... मी सावरू न शकलो तू निघून गेल्यावर... त्या सावलीच्या मागे काही आघात राहीले होते...... बरेच काही सांगायचे होते तुला निघुन जाण्याआधी कविता पुर्ण झाली. तरी शब्द राहिले होते ;">-पंचम

सद्गुरू माउली

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 11/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अजपाचे संगती | एकारली वृत्ती | ठाके सीता-पती | सन्निधानी || स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी | लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती || आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा | दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी || नाम जप गोडी | जरी लाभे थोडी | साधने तोकडी | बाकी होती || याजन याजन | दान तीर्थाटन | सद्गुरुवाचोन | शून्य होय || सद्गुरू माउली | देई नाम साउली | तेणे लोभावली | जिव्हा माझी || सागर लहरी - ११.७.२०१०

टंकेल वीडंबक जैं न काहीं

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 09/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
टंकेल वीडंबक जैं न काहीं . टंकेल वीडंबक जैं न काहीं, तैं हासयाला मिळणार नाहीं. कोठून पद्यें मिळतील ठोक? सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥ . कवित्व लोकांत जरी विकें ना, विडंबनीं खूप रुची जनांना. झाकावया लाज कवी न पाहो, विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥ . तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीडंबक जैं बिचारा!
काव्यरस

मीरा म्हणे ...........

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 09/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मीरा हसुनी सांगे राधेला रोजच भेटे श्रीहरी मजला हेवा मी करू तरी कसला तो माझ्यातच भरुनी उरला सकाळी माझ्या शेजेवरी सूर्यकिरण बनुनी येतो अल्लड उधळीत उषा लाडिक चाळा तो करितो स्नानासाठी मी जाता माझ्यास्तव तो जल होतो मी माळंता फुले सुगंधी तोच तयातुनी परीमळतो गंध उगळता त्याच्यासाठी चंदन बनुनी तो झिजतो माला गुंफता जाईची तो सूत्र म्हणुनी वावरतो मी नेसता वस्त्र रेशमी तो तयातील मार्दव बनतो मी करिता शृंगार दर्पणी तो सौंदर्य माझे होतो मी छेडीता वीणा विरागी तो तारांचे अंतर बनतो पायी बांधता मी घुंगरू नादमधुर तो झंकारून उठतो रात्री माझ्या गवाक्षातुनी चंद्र बनुनी पाझरतो नक्षत्रांचे
काव्यरस

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ|| उचल तुझे हात नको भिऊ आता आपूलाच जय होईल सीमेत शिरता झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१|| राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२|| पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला सामिल करू हलियाल,भा
काव्यरस

शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला
प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला किती वेचली फुले ओंजळ भरून आताच का लागली पानगळ शिशिर ऋतू का आला हेमंत सरून हरदिनी तुझी वाट बघणे वेळ लागतो म्हणूनी रूसणे येतील का आठवणी कधी परतून शिशिर ऋतू का आला हेमंत सरून मज आठवे ओंजळ फुलांची घट्ट केलेल्या दोन करांची तीच निष्प्राण फुले बघते आता वहीतून शिशिर ऋतू का आला हेमंत सरून धुक्यात एकदा गेलो पहाटे फिरावयास दोघे शालीत एकटे हाती हात धरता उब मिळाली स्पर्शातून शिशिर ऋतू का आल