Skip to main content

कविता

माहेराची आटवण येई

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माहेराची आटवण येई
आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ|| बाच्या मळ्यामंदी पिंपळाला बांधला झोका पुढं जाई मागं येई चुके काळजाचा ठोका पति संग बांधलं मन, इथं झुल्याला जागा न्हाई झोक्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||१|| भाऊ मुद्दामच बांधे झोका वरच्या फांदीला सुर जाई लांब मोठा जवा राही मैत्रीण जोडीला इथं मोठ्या शेहरात नावालाही सोबत न्हाई झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||२|| बरोबरीच्या पोरींसंगे खेळायाची सागरगोटी जिंकाया
काव्यरस

माझे बाबा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बाबा
बंडू म्हणाला माझे बाबा ताकदवान ऑफीसात सारे झुकवतात मान राम म्हणाला माझे बाबा आहेत मस्त ४ डिश भेळपुरी करतात फस्त शाम म्हणाला माझे बाबा करतात मस्ती मातीमधली जिंकतात कुस्ती खंडू म्हणाला माझे बाबा शेतकरी शेतात जावून उसाला पाणी भरी राणी म्हणाला माझे बाबा गॅरेजमधे जातात स्कुटर कारचे ऑपरेशन करतात चित्रा म्हणाली माझे बाबा डॉक्टर पण नाटकात असतात अ‍ॅक्टर सुंदर म्हणाला माझे बाबा आहेत बिल्डर क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट फिल्डर चिनू म्हणाला माझे बाबा शाळेत शिक्षक लेख कविता नाटकांचे करतात परिक्षण गणू रडत

पाउस आला पाउस आला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 25/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस आला पाउस आला
घंटा वाजली सुटली शाळा पाउस आला पाउस आला || दप्तराचे मोठे ओझे झाले वह्या पुस्तके भिजून गेले खांद्यावरतून फेकून देवू भरभर सारे घरी पळा पाउस आला पाउस आला || पुर आलेल्या ओढी जावू पुलावरूनी पुर पाहू उगाच जावूनी काठावरती ओढ पाण्याची पाहू चला पाउस आला पाउस आला || छत्री बित्री नकाच घेवू चिंब भिजाया घरीच ठेवू चिखलाचे सारे पाणी खेळा पाउस आला पाउस आला || * मिपा वरील हे माझे २०० वे टंकन होते.
काव्यरस

अरे देवा मी काही सुखी नाही

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 24/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अरे देवा मी काही सुखी नाही
नवरा आहे मुलं आहेत घरदार भरलेलं आहे तरीही मन रमत नाही अरे देवा मी काही सुखी नाही || अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे सजवलेला एसी बेडरूम आहे वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही अरे देवा मी काही सुखी नाही || नोकर आहे चाकर आहे स्वयंपाकासाठी मावशी आहे नावाला भाजीची फोडणी मी देई अरे देवा मी काही सुखी नाही || टिव्ही आहे डिव्हीडी आहे झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे तरीही करमणूक कशी नाही अरे देवा मी काही सुखी नाही

मी पहात होतो दूर...

लेखक भारतीय यांनी शनिवार, 24/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे. मी पहात होतो दूर, तू दिलास मजला सूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. मीच होतो मूढ, की तूच होती शूर, तू केलस मला चूर, मी पहात होतो दूर.. तुझा होता वेगळाच नूर, माझ्या भावनांना आला पूर, तू छेडलास माझा सूर, मी पहात होतो दूर.. तू आलीस जवळ पुरेपूर, सांग माझा काय कसूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. तू पलटविलास तूझा नूर, केलस मला भेसूर, मी पहात होतो दूर.... तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....
काव्यरस

फिनिक्स

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 24/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स इश्क जरी दाहक आग ही खेळ विस्तवाशी मांडला, राख जाहलो तरीहि डाव अर्ध्यावर ना सोडला. मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. निरंजन वहाळेकर
काव्यरस

लावणी : आसं कसं वो तुमी मर्द गडी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आसं कसं वो तुमी मर्द गडी
{{{कानडाऊ योगेशु वदला तू लावणी लिहायची फर्माईश केलीस तू पाषाणाने लिहीली लावणी आनंदाने वाचन करा आस्वाद घ्या तुम्ही सारे}}}
काव्यरस

देवा एक माझे | पुरवावे कोड |

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 22/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
देवा एक माझे | पुरवावे कोड | तुझे माझे आड | नको काही || नको कर्म कांड | नको ब्रह्म माया | येर झार वाया | संसाराची || नको बडिवार | सोवळे ओवळे | तेणे ना आकळे | सत्य तत्त्व || देवा ऐसे द्यावे | मज वरदान | नामानुसंधान | राहो सदा || तुझी श्याम मूर्ती | सदा राहो चित्ती | आणि सर्व वृत्ती | तुझे पाशी || सदाचा सन्नीध | माझ्या देव आहे | प्रेमे मज पाहे | ऐसे व्हावे || अलोट ते सुख | तुज मी स्मरावे | अंतरी राखावे | समचरण || प्रेम सागराचा | पूर तुझे दारी | सर्वत्र श्री-हरी | बाकी काय || -- सागर लहरी २२.७.२०१०

नका जावू अशा पावसात

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नका जावू अशा पावसात
सिच्यूऐशन: रातीचा पाउस पडूं र्‍हायलाय आन हिरो पहारा करायच्या डुटीला जावूं र्‍हायलाय......
भर रातीचं आभाळ फाटलं मनी काहूर काळजीचं दाटलं येळीअवेळी बाहेर पडता जीवा घोर लागं कारभारी....नका जावू अशा पावसात ||धृ|| उगा काळजी लागं दिसभर पडं संततधार रातीलाही नाही उतार घरातच र्‍हावा तुमी माझ्यासंगती घ्यावं मला उबार्‍यात कारभारी नका जावू पावसात ||१|| रातीला तुमी डुटीला* जाता उलटी सारी कामं करता एकलीचा माझा येळ जाईना कशी काढू मी रात कारभारी नका जावू पावसात
काव्यरस