Skip to main content

कविता

एक जुना मित्र भेटला ..

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज एक जुना मित्र भेटला .. गर्क स्वत:शी... पहात हसत राहिला जुने जुने.. सुने काही.. धुळी मधे गिरवत राहीला .. बरेच बोललो बसून दोघे .. बोललो दोघे स्वत:शी ... वाट पुढे धावणारी पुन्हा जुन्या वळणाशी .. हळवे शांत डोळे त्याचे .. वेडेपणाची झाक जराशी ... धुळी मधले नाव पाहून... मीही हसलो स्वत:शी... मीही हसलो स्वत:शी...

गे कविते

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गे कविते आज थोडा, दर्द ओला सजवून ये , मैफिलीचा रंग गहिरा, गर्द डोळां भिजवून ये .. १ बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी , चार गोष्टी अंतरीच्या, या जगा सुचवून ये.. २ कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या, वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३ -- सागर लहरी २२.२.२०१०

शॄंगार

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 04/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेले चिंबुन केस चुंबून सखे मोहरतो ओलेती झालिस तू, अन् न्हाऊन मनी मी निघतो डोळ्यातिल काजळ रेखा काळजात मी गिरवीतो शृंगार तुझा होतो अन् रंगून आत मी निघतो मलमली ओढणी मधला गंधार मनी घुमघुमतो नक्षीत बिलोरि तिच्या मी माझेच बिंब पाहातो काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो
काव्यरस

प्रलय

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 03/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय......... " येते “ म्हणून सांगून गेली, परतुनी ना आली पुन्हा. वाट पाहुनी जीव शिणला, दाटल्या अन्तरी यातना. परतीच्या वाटेवर तुझ्या, सजविला आसवांचा ताटवा . जाहले निर्माल्य त्याचे, येशील तू केधवा ? अनमोल निर्माल्य हे गंगेत कुठल्या वाहवू ? महापुराचा प्रलय नंतर, एकला कसा मी थोपवू ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

उगाच काहितरी

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 02/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दुखवट्याचा देखावा करून मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्या तसेच काहीसे झाले आहे फुर्रर्र्र फुर्र्रर्र्र्र फुर्र्र्रर्र्र्र सुंसुंसुंसुंसुंसुंसुंसुं नुसताच सर्टिफिकेटचा कागद घेऊन डोक्यात मात्र काहीच नसावे असेच काहीसे झाले आहे कुंडीत टोम्याटोचे झाड लाऊन टरबूज यावा अशी अपेक्षा करावी का पण असेच काहीसे झाले आहे हृदयात धडधड होऊन प्रेमाच्या ऐवजी हार्ट आट्याक यावा असेच काहीसे झाले आहे प्रेमाचा वॉलपेपर लावून आपले हित साधावे असेच काहीसे झाले आहे सुरुवातच कडू कडू केल्यावर शेवट तरी कसा गोड गोड होणार तसे करायची इच्छा मात्र होत आहे अशीच कडवाहट ठेवली तर आम्ही नाही ज्ज्ज्जा !!! ----------------------------
काव्यरस

छंद

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 02/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हा छंद जिवाला का लागला रे डॊळा भरुन तुला असे पाहते रे हा छंद....... बिलगुनी तुला अशी बसले मी स्वप्नात तुझ्या माझ्या रंगले मी तुला माझे म्हणताना फुलले रे डोळा भरुन तुला पाहते रे हा छंद....... हरवुनी तुला अशी बसले मी तू निघोन जाता का हरले मी स्वप्नच माझे बघ चुरगळले रे डोळे भरुन तुला मग पाहते रे हा छंद..... प्रसन्ना जीके. २६-११-०८
काव्यरस

संदेश

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 01/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या क्षितिजावरुनी संदेश कुणाचा येतो? हा किरण कुणाचा डोळां, ती नजर आपुली देतो? सृष्टीची तुटली नाळ हा कोण दवंडी पिटतो? उगवता सूर्य विश्वाचा हा कोण भुपाळी गातो? उपजला कधी, नसताना सदसद् वा अस्ती नास्ती? जन्माची ज्याच्या वेळ, वेळाच्या जन्मापरती आदीम क्षणांचा साक्षी, अदृष्ट पाहिले म्हणतो सत्याच्या खटल्यामध्ये हा कोण पुरावा देतो? सांकेतिक भाषा याची हो अर्थ गवसता त्रास खटल्याची तेव्हा पडते ही नवीन तारिख खास याला न तयाची खंत, हे गाव निरक्षर, झाले! जाईल पुढिल मुक्कामा, वा त्यापुढल्याही, चाले कालाच्या आदीपासुन, क्षितिजाच्या अंतापरती संदेश पसरतो आहे, एक साक्षर शोधत जगती

कृष्णपिसे

लेखक झुम्बर यांनी गुरुवार, 01/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ रीत होतंय आणि मोतीचूर सांडतय तरारून धरा आलीये आणि काहूर उठतय सावळभूल उठलीये कृष्णपीस लागलाय यमुनेच्या पुरापलीकडे मन वेड् धावतंय सरीबरोबरी भिजता भिजता सुरातही चिंब होतेय लाघव त्याच्या बासरीच जीवघेण छळंतय अशी ही निळी मेघभूल मला पुरती वेढतेय "इथेच आहे तो" भास असा सारखा देतेय चांदण्या शिवाय अवघं आकाश श्याममय झालंय मलाच तो गवसेना पण आभाळ त्याने व्यापलाय वर्षेसारखी तुटून तुटून मीही मनभर ओसंड्तेय कृष्णंगहिरे रूप साजिरे ठाई ठाई शोधतेय आणि अचानक मला कसली चांदण मिठी पडली आणि माझी ओळखा सगळी त्याच्यामध्ये विरली सापडला माझा कृष्णसखा अन मी मुरली झाले आभाळ रिते होतच होते मी कृष्णं ओठात
काव्यरस

गाणे : पायी चालतोया पंढरीची वारी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पायी चालतोया पंढरीची वारी चाल: एखाद्या अभंगाची (तेथे ऐका: http://www.youtube.com/watch?v=9wwsu4VyoPM ) पायी चालतोया पंढरीची वारी वारी...वारी.... पायी चालतोया पंढरीची वारी मुखी बोलतोया पांडूरंग हरी पांडूरंग हरी हरी...पांडूरंग हरी पायी चालतोया पंढरीची वारी ||धृ|| संत सज्जन सगळे, नाचती गाती मेळा भरवीती सारखे चालती कुणी छेडूनी विणा, टाळ हाती धरी पायी चालतोया पंढरीची वारी ||१|| तुळशीचे घेतले रोप डोई माऊलीने अनवाणी पायात केले घर काट्याने व्यर्थ नाही चिंता मन नाही संसारी पायी चा
काव्यरस

..रस्ता..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 30/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता -------------------------------------------- जो तो म्हणुन गेला,वाटेत भेटणारा.. रस्त्यात गाव नाही..रस्ता लुबाडणारा .. पाऊल टाकणे हा, उपचार फक्त ठरला.. रस्ता मला मिळाला,मजलाच टाळणारा.. दिसता कधी कुठेही पाऊलवाट छोटी.. रस्ता उगाच बनतो..छीचोर वागणारा.. रस्त्यात साथ मिळता,हातात हात येता.. रस्ता बनुन जातो, भलता लुभावणारा.. रस्त्यास थांब म्हणता..गर्रकन वळुन गेला.. रस्ता कधीच नव्हता कोठेच थांबणारा.. ------------योगेश जोशी