Skip to main content

कविता

गीत : सूर आज माझे का अबोल झाले

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सूर आज माझे का अबोल झाले
आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले सूर आज माझे का अबोल झाले ||धृ|| माझ्या हृदयीच्या छेडूनी सप्त तारा आरोह अवरोहा संगे चाले मन भरारा असलेच कितीक राग नित्य नवे ऐकले ||१|| झंकारूनी स्वरांना घेवूनी रोज ताना ओठी माझ्या येई फुलोनी नवा तराणा कसले आता गाणे कसले नवे तराणे ||२|| मैफलीत माझ्या कधी मालकंस आला वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले ||३|| आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले सूर आज माझे क
काव्यरस

वारी

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 17/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आले माहेरी माहेरी माझ्या विठाईच्या दारी फारा दिसांनी ग झाली माझी पंढरीची वारी वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर आता पाय स्पर्शू किती घेऊ आशीर्वाद किती किती मातीचे ओघळ ओघळवू मी या हाती माझी पंढरीची वाट वाट सूर्याची पूर्वीची आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची गेलं माहेर माहेर झाला वळसा वळसा चंद्रभागेच्या पाण्यात माझा बुडला कळसा
काव्यरस

एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 16/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच विषयावर दोन , दोन विडंबनं येण्याचा प्रकार दोनदा घडला, मग आम्हाला काही नतद्रष्ट शंका आल्या... एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन शंका विचारणारे, नतद्रष्ट आम्ही कोण? पहिलेच काव्य येई नावाने केसुरंगा केशवसुमार देती पुढचे विरुद्ध अंगा दावीत दोन्हि रंगा पाध्ये चतूर दोन? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? पाध्यांस प्रश्न भारी, पडतोय या क्षणासी पंचास काय बोलू, अन् काय सदस्यांशी? दळली पिठी कुणाची, जात्यात आणि कोण? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? एके दिनी परंतू पाध्यांस त्या कळाले कंटक जरूर
काव्यरस

एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख

लेखक केसुरंगा यांनी गुरुवार, 15/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काल जालभ्रणकरताना मिपाच्या दिशेने बराच धुरळा उडलेला दिसला. नक्की काय झाले पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काही जालकंटक आणि पाध्ये यांच्यात चौपाटीवर खडाजंगी चालू होती.. धोरणे, अन्याय , आणीबाणी, गुंड, आयोजक, यजमान, कुत्रे, डुक्कर, इंदिरा गांधी वगैरे वगैरे शब्द फेकाफेकी सुरु होती.
काव्यरस

मी न माझा………

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 15/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी न माझा……… गुंतलो इतुका ईश्कांत तुझिया राहिलो अता मी माझाच नाही. आभासत नाही ज्या गंधात तू, तो गंध मज मोहीत नाही. जी वाट जात नाही तुज घरां, वाटेवरून त्या मी जात नाही. ज्या फुलांत ना कोमलता तुजसम, ती फुले मी वेचीत नाही. हृदय वेदना ज्यां नं जाणवती तुला, वेदनाचे अशा मज दुखः नाही. भेटली आताच पाहिले डोळे भरुनी, विरहाचे आता मला दुखः नाही. सामावली श्वासांत, रंध्रा रंध्रात तू, अस्तित्व मजला तुजवीण नाही निरंजन वहाळेकर

कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ|| वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१|| कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२|| पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू
काव्यरस

नाव सुचत नाही.

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 15/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पसरुनी दो बाहु, फांद्यावरी, अविरत वणवा साहिला, शहारा पाठी सारीत; गात्री, संतंत धार वर्षा झेलला । नजर न वळली कधी तुजवरुन, कधी न श्वास तुजविण फुलला, का न कळे या मनास माझ्या; ध्यास तुझा असा जडला । फुलवेल मी... फुलवेल मी; फूलणे न फुलणे, माझ्या हाती नसे, जरी मनास न भावले; तरी मातीशी ईमान असे । उपटुनी जरी परत रोवीली रुजणे माझा धर्म. धन्यास परतुन ; ओंजळी भरुन, स्वतःस लुटणे, हे कर्म!! अपर्णाअक्षय.

शून्य

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 15/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य शून्य गाव शून्य वस्ती शून्य झाडे शून्य घरटी शून्य खिडक्या शून्य दारे शून्य भिंती शून्य वारे शून्य दिवा शून्य वाती शून्य पणती शून्य ज्योती शून्य शब्द शून्य अर्थ शून्य ओळी शून्य पानी शून्य डोळे शून्य आसू शून्य गाली शून्य हासू शून्य अधिक शून्य वजा शून्य हाती शून्य बाकी शून्य जगतो शून्य आम्ही शून्य सारे शून्य मीही सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस

एक फार्सी गज़ल.....मिर्झा महम्मद हसन ( कातिल )

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 14/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या. सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक !