कोठे गेले पूल, कोठे गेले रस्ते,
सापडत नाहिये व्यायामशाळा
मुलांचे दप्तर, वह्या अन झब्बे
अन आज काय तर गेले पाणी
अन सोबत गेल्या वाहूनी जल-वाहिन्या
दॄष्टीहिनास मिळाला आज काय सांगू
जड-वाहन चालविण्याचा परवाना
गल्ली-बोळात गरज तिथे उभा आज
वैद्यकिय सहाय्य्कांचा दवाखाना
ओरबाडली गेली लज्जा कुणाची
दमटवले गेले कुणाला
दाबली जमीन कुणाची
तर खल्लासच केले कुणाला
अपंग व्यवस्था, लुळे कायदे
लुटले गेले आज भर चौकात
मज दिसलेच नाही हे सगळे काय सांगू
'व्यस्त' होतो मी 'जवळचे' बघताना
लोचट-गिरी ला उरले नाही वय
पाहावा तिथे रोग मानसिक विकॄती चा
लहान असो वा मोठी - लाज कुणाची
तिला वरतून खाली बघातांना
साठे झाले जप्त, सा