मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

जा हसत दूर जा

गणेशा ·
लेखनविषय:
जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको जा हसत दूर जा त्रासलेला तुझा होकार नको घाव घातलेल्या ओंडक्यासम ह्रदयावर प्रेमाचा पुन्हा नवा अंकुर नको जा हसत दूर जा सोडणार्‍या साथीचा आधार नको परत परतण्याचा विचार नको ह्रदयावर नवीन वार नको जा हसत दूर जा मनाशी आता कुठला ही धागा नको तुटणार्‍या या नात्याला आशेचा आणखीन एक बंध नको जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको ---- शब्दमेघ

एक त्रागा सुनेचा

विदेश ·
काव्यरस
(चाल : एक धागा सुखाचा -) एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे - घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे ! तू असशी जरी कर्ता तगडा , सासू सुनेचा बघशी झगडा - सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे ! उचलबांगडी बालपणाची , धुळीत स्वप्ने तारुण्याची - जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे ! सासू सुनातें बघतो कोणी , एक सारखी बसती फुगोनी - कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !

मोज्-माप किती...

निनाव ·
लेखनविषय:
बघत आभाळा कडे गेल्या निघून प्रहर किती आले किती गेले किती मनी माझ्या भाव किती मोजलेच कुणी श्वास मिळाले कुणास किती घेतले जितुके मिळाले, सोडले कुणास ठाउक किती स्वप्नांच्या प्रवासात काढले का डोळ्यांचे कुणी तिकिट कधी गेले किती, भिजले किती, परतले किती, विसरले किती वाटांनी मोजले का कधी अंतर पार केले किती थांबले किती, आले किती, गेले किती, न परतले किती कुणाची लागली चाहुल, लागली झोप कुणास किती जागले कोण, झोपले कोण, प्रश्न आहेत अनुत्तरित किती प्रेम झाले, राग आले, क्लेश झाले, द्वेश झाले किती झुकले मन किती, वाकले मन किती, तुटले किती, जुडले किती

(एका तळ्यात होती)

मूकवाचक ·
लेखनविषय:
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते अतिशहाणे पिल्लू तयात एक घेताच कोणी त्याला खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे बळेच ते तरंगे दावूनी बोट त्याला म्हणती खजिल लोक आहे अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक पिल्लास माज भारी खुळे म्हणे सर्वांसी पाखंड अविचारी सांगेल ते जनांसी जो जो तयास टोची दावी उगाच धाक होते अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक एके दिनी परंतु पिल्लास ना कळाले ढापीव ज्ञान त्याचे डबक्यामध्ये बुडाले घाणीत डुंबताना जन्मांतरी कित्येक कधी न त्या कळाले तो मंडूकच एक

नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू

पाषाणभेद ·
लेखनविषय:
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू
चला लवकर यारे सारे मराठीची गुढी उंच उभारू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||धृ|| चला एक मोठी काठी आणू शालू बांधून तिला आपण सजवू हारकडे अन फुलमाळा हारकडे अन फुलमाळा बांधून वर एखादा लोटा घट्ट बसवू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||१|| पाडव्याच्या शुभमुहुर्ती मंगल कार्य सुरू हो करती दारी तोरण अंब्याचे दारी तोरण अंब्याचे लावून अंगणी मंगल सडा चला शिंपडू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||२|| उत्साहाचा वारा आता

आश्वस्त

सोनल कर्णिक वायकुळ ·
लेखनविषय:
ह्या रेताड रखरखाटात कोणास ठाऊक कशी चिकटून बसलीत ही पाती आणि कोण सोस त्या वा-याला सुद्धा ह्या जळजळाटात स्वतः तापत फुंकर घालण्याचा तरी मृगजळाला सुद्धा भास व्हावा मोरपिसांच्या रंगांचा? ह्या वेडेपणाच तू नाव आहेस कि कारण हे माहित नाही पण तुझा हात इथे फिरलाय हे नक्की…

दाणे पडले टप टप टप

विदेश ·
लेखनविषय:
दाणे पडले टप टप टप चिमण्या गोळा पट पट पट चिव चिव करता टिपती दाणे टिपता टिपता म्हणती गाणे या रे पिलांनो जवळी या आपण गाणे गाऊ या घरटे काडयांनी सजवू दाणे पोटापुरते जमवू हाव नको ती जास्तीची सवय करू या कष्टांची चोच दिली ज्या देवाने घास ठेवले समोर त्याने आभार त्याचे मानू या चिव चिव गाणे गाऊ या