मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दूर वाट अशी ही छळणारी

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दूर वाट अशी ही छळणारी वळणावर अलगद निजणारी; रात्र मोजती अंतर किती अंतरावर तुझ्या ही सळणारी. ह्रदयी टोचते ही पानगळ मनास बोचतो गार वारा; येशील कधी तु सांग सख्या रे झुंझते वात ही विझणारी. नागिण विरहाची भिरणारी आवळते पाश भोवती मज असा; येशील कधी तु सांग सख्या रे विषदंश हर-क्षण ही घेणारी. खडू आठवणींचे नदीत टाकतांना तरंग एक एक उठणारी; येशील कधी तु सांग सख्या रे जगेल तरंग का ही विरणारी.

वाचने 968 वाचनखूण प्रतिक्रिया 2

ajay wankhede 16/04/2011 - 17:48
खडू आठवणींचे नदीत टाकतांना तरंग एक एक उठणारी; येशील कधी तु सांग सख्या रे जगेल तरंग का ही विरणारी. मित्रा..प्रत्येक श्वास हा अनित्य आहे...तसेच जिवन पण ... कविता आवडली.