Skip to main content

कविता

आज ही गेले

लेखक निनाव यांनी रविवार, 10/04/2011 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!! न आठवलो मी कुणास आजही न कुणी मज आज भेटीस आले!! बघून आभाळ खिडकी तुन म्हणतो मी चला दिवस अजुन एक कमी झाले!! अनवाणी चालतांना टोचले जर पायी अजुन एक घाव, नवीन काय झाले!! कुणी ठेवले नाव मज, तिच्या नावानं नाव असे झालेच, तर निनाव काय झाले!! आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!

संकल्प सिद्धी

लेखक बाळासाहेब तानवडे यांनी शनिवार, 09/04/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्प सिद्धी मिळेल जीवनात खात्रीने जय. पहिलं पक्क असावं अंतिम ध्येय. स्वप्नरंजनातच न व्हावं चकित. कागदावर ध्येयाच होऊ दे लिखित. नवी कल्पना नित्य लिखितात भरु दे. अंतिम ध्येयाला परिपूर्णत्व येऊ दे. सार्याय कल्पनांची आता योजना बनु दे. प्राथमिकता महत्ते अनुक्रम ठरू दे. नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट. पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट. आता ना कशाची वाट पहावी. तत्काळ कार्याला सुरुवात करावी. एक ही दिन ना व्यर्थ असावा. अंतिम ध्येय प्राप्तीतच अर्थ दिसावा. लिखित ध्येयाच महत्व सर्वास कळावं. मनाजोग यश सर्वास मिळावं. कवी : बाळासाहेब तानवडे © बाळासाहेब तानवडे – ०४/०४/२०११
काव्यरस

तुझ्या सावलीस लपता लपता

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 08/04/2011 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा देत आहे ही रचना.. ------------------ तुझ्या सावलीस लपता लपता जात होतो गल्लीत अंधार जसा कुठे होते ठाऊक तरी मला भेटशील तिथं ही तु अशी वेड्यावानी माझी वाट बघता विखुरले काच असे आज खाली असंख्य तुकड्यांमधे तारेच ओठी लागायचे माझ्या कधी नजर काढून माझी झाले रक्तरंजित विघ्न जणु माझे हरता शोधत राहिले ते सारे त्याला त्या घरातच हसु न आवरले मज पाहाता पाहाता गुंतले होते मन कुणाचे किती बघत जड होता तो कोपर्‍यात उभा दाटुन होते मन त्याचे जाता जाता राहिले रिकामेच ते घर त्याच्या गेल्यानं न आलेच मृत्युही तिथे राहावयास कधी एकटेपण आले मग असे काही शेजार कुणी नसलेले जगले काही काळ निनाव राहता

बहकलेले दिवस

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 08/04/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
कसे ते बहकलेले दिवस अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री मोहर तुझ्या अवघ्या देहास अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री एवढे एवढे होत उरले होते जग फक्त आपल्या दोघांचे क्षणाक्षणांवर उमटले होते सुंदर ठसे आपल्या मिलनाचे सहवासी सुखाचा सोहळा निळ्या नभीचा निळा चांदवा अद्भुत अनुभव आगळा तुझ्या मिठीचा नवा गोडवा कंपित ओठांची धुंद सय थरथरते स्पर्श मोरपिशी गंधित श्वासांची संथ लय झरझरते हर्ष हृदयाशी झुगारून दे काळाची बंधने फिरून जागवं ते क्षणन् क्षण उभारून दे स्मरणांची स्पंदने भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०४/२०११)
काव्यरस

आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 08/04/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का? नजरेत भरतील मात्र सर्वेच, तसे नाही. पानं झाडांवर किती तरी हिरवे, बघ जरा पण सुखावतील नजरांना सर्वे, तसे नाही. मग प्रेम तरी का व्यक्त व्हावे माझे मग का मी वेड्या सारखे वागावे माझे वेडेपण आवडेलही कुणाला पण तुलाच आवडेल, तसे नाही. प्रेमाच्या परिभाषेत बसणारे शब्द सारे बसतील तुझ्या-माझ्या भाषेत, तसे नाही. हातात धरून हात कदाचित धरु ती वाट अन मन माझे शोधेल एक घर पाखरांचे फुलतीलही स्वप्न कदाचित त्या बागेत पण येईल वास त्या फुलांस, तसे नाही. आसमंतात तारे सर्व निळेच , आज ही. चमकतील मात्र सर्वेच रात्री, तसे नाही.

<पेयनिष्ठ पेताडाचा कर्मदरिद्री बाटलीभंग>

लेखक लंबूटांग यांनी गुरुवार, 07/04/2011 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा बसे उकिडवा बाटली उघडून चखणा खातो कर्रम कुर्रम प्रचंडकुंथी वायूप्रदूषण धडाम धुडूम्म धडाम धुडूम्म शेव न चकली उडतो फन्ना पेला भरीतो आणिक एक आता जगाची सोडून चिंता फाड फाडतो इंग्लिश भेदक ग्लेन्मोरेन्जी यथेच्च ढोसून निरर्थ काही बर बर बरळीत शिग्रेट बीडी ओढून ओढून वूक्खु विक्खी खोकत खोकत खरडत खुरडत सावरि धोत्रा त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा बाथरूमचा कडाकोयंडा जाईजाईस्तो घडे अभद्रा आकाशातील सप्तढगावर ह्याला फाट्यावर त्याला फाट्यावर मग खंबा तो संपेस्तोवर टांगा पलटी घोडे फरार Disc