Skip to main content

कविता

पु.ल. आणि अत्रे-एक दर्पण

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/05/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कवितेच वर्गिकरण मि हास्य रसात केलय,पण मुलत: तो असला नसला तरि फारसा फरक पडणार नाहि.कारण हास्यरस हा या दोन माणसान्च्या व्यकक्तित्वाचा अविभाज्य घटक होता.दर्पण हे या कवितेच न्निवळ नाव नसुन तो खरच या कवितेचाहि स्वभावधर्म आहे...हास्यवेदाचार्य-आचार्य अत्रे आणि हास्ययज्ञनारायण-पु.ल.देशपान्डे...यान्ना अर्पण... १)कधि कधि मि पु. ल.न्चा,कधि कधि मि अत्र्यान्चा.प्रश्न उरतो मधे फक्त वेलान्ट्या आणि मात्रान्चा२)पु.ल.म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या साथ आहे.अत्रे म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या 'आत' आहे.३) म्हणजे पु.ल न्च खद्य हे,दहि आणि भात होते.
काव्यरस

प्रेम आणि मरण

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/05/2011 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
निघालो क्षितिजा स गवसणी घालायला अश्वमेघ सोडला दिग्विजयी व्हायला सळसळते रक्त, धगधगते मन, चौफेर उधळले वारू मनाचे सर केले अवघड मनोरे स्वन्प्नांचे रणधुमाळीत या सार्‍या विसरलो सखे “प्रेम” काय चीज असते ते इतका बे दर्दी कसा झालो कळलेच नाही कळलेच नाही तुझ्या डोळ्यातील भाव नकळतच झेलत राहिलो प्राक्तनाचे घाव जगण्याचे संदर्भ हि विसरलो मरणा च्या वाटेवर नि आज ...जीवनाच्या वळणावर एकटाच अजेय परतीचा प्रवासी दमलेले थकलेले प्रारब्ध.. जीवन कुठेच थांबत नाही हे हि खरेच थांबलास तर संपलास हे हि खरेच पण चुकणार नाही आता जीवंतपणीच घेणार अनुभव मरणाचा करणार “प्रेम” तुटून आता परतीच्या वाटेवरील लेऊन घेण

संदर्भ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 09/05/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमओले तप्त ओठ आज पुन:श्च थरारले तू समोर ठाकताच फिरुनी शुष्क जाहले तव लोचनी तरळताच रंग माझिया प्रितीचे गालावरील गुलाब तुझिया बघ उमलू लागले सात्विक चेहर्‍याशी ती लाली पाहून नयन सुखावले क्षणी मनात माझिया तुळशी वृंदावन उमटून गेले नजर भिडताच कस्तुरीगंधित काया किंचित थरारली रुपसंपन्न मृगनयनी नवतारुण्य अवचित अवगुंठले प्रयास तो अनुराग लपविण्याचा किती निष्फळ नजर अन् मनातील द्वंद्व पहा लख्ख दिसू लागले
काव्यरस

ब्रॉयलर कोंबडी सारखे हे शहर ....!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 09/05/2011 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे शहर झालेय ब्रॉयलर कोंबडी सारखे गुबगुबित देखणे तरी सत्वहीन नुसतेच मास अंगावर बेचव नि अळणी संस्कृतीहीन झालेय हे शहर नि येथला निसर्ग देखील कृत्रिम झालाय नुसतीच फुले आकर्षक गंधहीन .........! सुजत चाललय हे शहर वाढत चाललय बाद्लीबाद्लीने ओतली जातात येथे माणसे नकोतितक्या भन्नाट वेगाने कोण कुठली ...? बिन चेहर्याची .....
काव्यरस

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

लेखक विदेश यांनी रविवार, 08/05/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी ) नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती चालली खरेदी.. थांबेना ती |धृ | सवलतींचा ताजा - लागतो ढीग नाचती विक्रेते.. मागे पुढे |१| नव्या साडीसाठी - माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब भांडणात वाढ.. पत्नीसंगे |२| नव्या साडीसाठी - मागची उधारी - राहिली अजून जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही |३| नव्या साडीसाठी -
काव्यरस

माणसान्चा देव

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/05/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास.
काव्यरस

लोकल शोध-

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 07/05/2011 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी ढुंडाळली चिंचपोकळी दातीवली कळंबोली आयरोली घणसोली उमरोली धाव घेतली कांदीवली खोपोली डोळावली केळावली आंबिवली बघून झाली घुमुन घुमुन मायला इज्जत गमावली छोकरी हाती नाय आली पुरब पश्चिम भेंडी पालथी घातली लोकलची गुंतावळी हार्बर मार्गावर कुणी नव्हतीच मुळी आपलेवाली घरवाली लोकल पोरगी शोधायला दरदर भटकलो चारो ओर मरमर भोईसर दहिसर अगदी पार खारघर वरी देख्खानी उल्हासनगर कोंबून लोकलमधे चिंबून खारावली पांढरी पॅन्ट झाली काळी आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी नव्हतीच अपल्या साली भाळी
काव्यरस

Two Friends

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/05/2011 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
Two Friends
Little John was thin and boney; His fat friend had a name Tony ||1|| Once both were gone in the woods; They had school bags without any food ||2|| Tony feels hungry in the after noon; John said I'll get the food very soon ||3|| John climbs on a Mango tree as he saw; a watchman came while plucking up mangoes raw ||4|| John jumped down and ran away fast; Watchman caught Tony at the last ||5|| - Pashanbhed (Stone breaker) 07/05/2011 4:15AM
"अर्रर्रर्रर्र...
काव्यरस

जर तू असता तर

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 06/05/2011 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
जर तू असता तर तुला दिसले असते सुरे घेतलेले हात कल्ले कापलेलं शरीर निळ्याशार पाण्यातला लाल ढग तुला दिसले असते अजस्त्र शरीरावरचे निर्जीव भासणारे डोळे दिसलीही असती त्यात वेदना पण नसती दिसली दया याचना जर तू असता तर तुला दिसले असते काळे पिवळे पट्टे आणि त्यावर लाल जखमा भेदरलेले गोड बछडे आणि जमिनीवर आपटलेली शेपटी दिसले असते तुला थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा पण तुझ्या प्रार्थनेची वानवा जर तू असता तर तुला दिसले असते कुर्‍हाडीचे घाव सोसणारे महाकाय मूक वृ़क्ष चूड घेतलेल्या हातांनी पेटवलेले भीषण वणवे उघडे बोडके डोंगर त्यावरचे तुझे मंदिर आणि हातापाया न पडता समोर कोसळणारी झाडे

तुझी आठवण येते....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी गुरुवार, 05/05/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण येते.... कितीही विसराव अस म्हणालो तरी, का..? कुणास ठाऊक पण...। तुझी आठवण येते.... एकट्यानेच चालताना वाटेवरूनही, तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर, आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... कुठून तरी एखादा आवाज कानी येतो खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो, आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...। का..?