Skip to main content

कविता

काल रात्री

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 27/04/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | ..........
काव्यरस

गीत

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/04/2011 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात.
काव्यरस

ये दौलतभी ले लो

लेखक शरद यांनी मंगळवार, 26/04/2011 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ये दौलत भी ले लो गत दिनांची आठवण कोणाला येत नाही ? त्या दिवसांतील आठवणी निरनिराळ्या असतात. भर्तृहरि " सा रम्या नगरी महान स: नृपती.." म्हणेल व शेवटी "कालाय तस्मै नम:" म्हणून मोकळा होईल तर कोणाला पुण्यातील "बादशाही खानावळ " आठवेल. भवभुतीच्या उत्तर राम चरित्रातील राम व सीता यांना अयोध्येत, राजवाड्यात ऐषारामात असतांना सुद्धा वनवासातील झोपडीत गप्पा मारत कंठलेली रात्र आठवून " रात्रीरेव व्यंसरित " असे म्हणावे वाटेल. एखादा नभातील चंद्र पाहून "ती न आर्तता ऊरात ,," म्हणत दु:खाला वाट करून देत असेल तर दुसरा एकामेकावर उधळलेल्या फूलांची आठवण करत " गेले, ते दिन गेले " असे उसासे टाकत असेल.

माझा देश वेगळा...

लेखक हैयो हैयैयो यांनी मंगळवार, 26/04/2011 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
तूही मीही एकाच देशाचे नागरिक असे म्हणतोस.. परंतु, मित्रा! तुझा देश वेगळा, माझा देश वेगळा.. तुझा देश मातीचा.. माझा देश माणसांचा.. तुझ्या देशाची सीमा काट्यांच्या कुंपणांची.. माझ्या देशाची सीमा फुलांच्या पाकळ्यांची.. तुझ्या राष्ट्रगीतांत नुसतेच शब्द.. माझ्या राष्ट्रगीतांत जिवंत संगीत.. तुझा देश रक्तरंजित चरित्र, माझा देश सुंदरशी कविता.. तुझ्या देशांत शिरगणती.. माझ्या देशांत विचारगणती.. तुझा देश कायद्याचे राज्य.. माझा देश प्रीतिचे स्वराज्य.. तुझा देश वर्णतंट्यांचा माझा देश इंद्रधनुष्याचा.. तूही मीही एकाच देशाचे नागरिक असे ह्मणतोस.. म्हणतही असतील, म्हणू देत.. परंतु, मित्रा! तुझा देश वेगळ
काव्यरस

बस स्टँड

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 26/04/2011 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
बस स्टँड परवाच खुप कधीचा गावाकडे गेलो. तशी आठवण यायची पण सवड नव्हती होत. म्हणून वेळात वेळ काढून गेलो. आठवणीतल्या आठवणी आठवीत गेलो.
काव्यरस

झाड आठवणींचे

लेखक निनाव यांनी मंगळवार, 26/04/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवणींचे झाड आज, अजुन एका वर्षांनी मोठे झाले! - अभिनंदन तुला. आपल्याला भेटून आज पुर्ण एक दशक झाले! दहा वर्षात ह्यां ॠतु सगळेच गेले गं येऊन अन पायाखालची मातीही गेले भिजवून जाणवले का तुला मात्र मनी? वियोगाचे मुळ कसे अधिकच घट्ट गेले होऊन!! असे कोठे ठरविले होते आपण? - मग असे का झाले? - सांगशील का मला? आपण लावलेले रोप्ट्याचे नकळत झाड कधी झाले! रोज आभाळाकडे बघत वाढतांना ह्या झाडाच्या फांद्या पसरल्या आहेत आता अधिकच रुंद हल्ली काळजी घेतो मी खाऊ नये कुणी कधी चुकून मोहक दिसणारी ह्या झाडाची विषारी फळे हे झाड जरी असले हिरवे - कापता येईल का ह्यास? - तुझ्या येण्यानं मात्र. अन्यथा नशीबी

प्रीतीचा वर्षाव ...

लेखक ajay wankhede यांनी मंगळवार, 26/04/2011 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीचा वर्षाव प्रिये तू देऊ नकोस डोळयात अश्रूंना स्थान कारण अश्रू प्रीतीचा झरा आटवतो. प्रिये तू येऊ देऊ नकोस गालावर रक्त चंदन राग कारण राग प्रीतीचा झरा आटवतो. प्रिये तू करू नकोस ओठांवरून मद मत्सर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव कारण मद मत्सर प्रीतीचा झरा आटवतो. प्रिये तू फक्त ऐवढेच कर..... तू हळुवारपणे केसांना मोकळे सोड , पाणीदार पापण्यांना हलकेच वर खाली कर , गोड गुलाबी गालांवर पारिजात फुलू दे , ओठांवरील रक्तिम लव हलकेच थरथरू दे, नि या जगावर प्रीतीचा वर्षाव कर . प्रिये फक्त तू ऐवढेच कर...

माझ्यामधील एक भाग चालत गेला दुसरा रस्ता

लेखक धनंजय यांनी सोमवार, 25/04/2011 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
Two roads diverged in a wood, and... I took the one... And that has made all the difference. Robert Frost (1874–1963)
माझ्यामधील एक भाग चालत गेला दुसरा रस्ता - - - - - जाता जाता पुढ्यात माझ्या होत्या मागे दोन वाटा, त्यांत निवड केली, त्यातून पुढे सगळा फरक पडला. म्हणून वाटते, तोच प्रसंग आहे इतका स्मृतीस भिडला जरी फुटला पुढे त्याही फाट्यास फाटा, फाट्यास फाटा. माझ्यामधील एक भाग आतल्या आत देऊन छाटा चालत गेला दुसरा रस्ता, हा सोडून पलीकडला. मी येथे चालत चाललो तो तिथे जडत जडला. दोन्ही डगरी अनुसरतो, तरी सलतो टाचेत क

गवसला एक पाहुणा : लावणी

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 25/04/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
गवसला एक पाहुणा : लावणी पहाटलेली विभोर लाली उधाण वारा पिऊन आली मस्तीतकाया, धुंदीत न्हाया कशी उतावीळ झाली गं बाई उतावीळ झाली मन ऐकेचना, तन ऐकेचना जाई पुढे, पळते पुढे सांगू कुणा?
काव्यरस