Skip to main content

कविता

दूर वाट अशी ही छळणारी

लेखक निनाव यांनी शनिवार, 16/04/2011 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
दूर वाट अशी ही छळणारी वळणावर अलगद निजणारी; रात्र मोजती अंतर किती अंतरावर तुझ्या ही सळणारी. ह्रदयी टोचते ही पानगळ मनास बोचतो गार वारा; येशील कधी तु सांग सख्या रे झुंझते वात ही विझणारी. नागिण विरहाची भिरणारी आवळते पाश भोवती मज असा; येशील कधी तु सांग सख्या रे विषदंश हर-क्षण ही घेणारी. खडू आठवणींचे नदीत टाकतांना तरंग एक एक उठणारी; येशील कधी तु सांग सख्या रे जगेल तरंग का ही विरणारी.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

पाऊस माझा

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाचं पावसाशी स्वतःचं असं एक नातं असतंच शिवाय ते वेगवेगळ्यावेळी वेगवेगळंही असतं.

आकुंचन

लेखक निनाव यांनी शनिवार, 16/04/2011 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोठे गेले पूल, कोठे गेले रस्ते, सापडत नाहिये व्यायामशाळा मुलांचे दप्तर, वह्या अन झब्बे अन आज काय तर गेले पाणी अन सोबत गेल्या वाहूनी जल-वाहिन्या दॄष्टीहिनास मिळाला आज काय सांगू जड-वाहन चालविण्याचा परवाना गल्ली-बोळात गरज तिथे उभा आज वैद्यकिय सहाय्य्कांचा दवाखाना ओरबाडली गेली लज्जा कुणाची दमटवले गेले कुणाला दाबली जमीन कुणाची तर खल्लासच केले कुणाला अपंग व्यवस्था, लुळे कायदे लुटले गेले आज भर चौकात मज दिसलेच नाही हे सगळे काय सांगू 'व्यस्त' होतो मी 'जवळचे' बघताना लोचट-गिरी ला उरले नाही वय पाहावा तिथे रोग मानसिक विकॄती चा लहान असो वा मोठी - लाज कुणाची तिला वरतून खाली बघातांना साठे झाले जप्त, सा

कृष्ण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 15/04/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण - १ कधी कधी वाटते...... कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे...... पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्‍या कदंब वृक्षाखाली.......... सुंदर मोरपिसांच्या........ मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली..... उदात्त युगांतीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी.... म्हणजे मग..... द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना....... साध्या सुती साडीच्या दोन हात..... तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही....... कृष्ण - २ पण मग नंतर वाटते...... राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे......... कृ

धंद्याची स्वप्ने बघणारा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 15/04/2011 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
जख्ख असा म्हातारा झाडाखाली गाडी लावून वाट बघत बसतोय गिर्‍हाईकाची ठेवतोय कसले कसले रंग ढकलगाडीवर.... गुलाल ,रांगोळ्या ,उटणे ,उदबत्त्यांचे पुडे , हेयर पिन्स ,बांगड्या,फुगे जे हवे ते ,जे लागेल ते आकर्षित करतोय बायका -मुलांना त्याला वाढवायचाय धंदा भरपूर ....!! स्वप्ने बघतोय श्रीमंत होण्याचे हातावरच्या फुगलेल्या निळ्या शिरा वाटतात भीतीदायक...!! वय सरकल्याच्या खुणा शरीरावर ठाण मांडून .... तरी स्वप्नाची हाव लंपटपणे जिवंत ठेवतेय त्याला काहीतरी करून दाखवायची हिमंत अजून तेवतेय त्याच्या मनात वाट बघत बसलाय गिर्‍हाईकाची तो आशाळभूतपणे ….. कोणीतरी येईल नि काहीतरी घेईल लुकलुकून जातात त्याचे गढूळ ड
काव्यरस

मिठीतली रात्र

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 15/04/2011 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे आवरे मोह मज न अधिक आता पडदा तारकांचा पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे माझ्या कुशीत तु उजळला अधिकच तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे न आवरे मोह मज अधिक आता पडू दे तारकांचा पडदा ना रे...

एकलाच (ओवी-गीत-गझल-कविता)

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/04/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
१. (ओवी) प्रश्न प्रश्नांचे उत्तर दु़:ख सुखाचे आधार माझ्यासाठी मीच आता एकलाच दारोदार || चांदण्यास चंद्र भार नेत्रातुनी संथ धार परका आप्तजनात एकलाच मुक स्वर || भावनांचा कोरा पुर स्वप्नांचाच स्वैर धुर मनास अनोळखी मी एकलाच दूर दूर || कोण कोणाचा इश्वर माणुसकीचा संहार कुरवाळत दु:खास एकलाच जातो दूर || २. गीत ( राग लक्षात नाहिये, कारण त्यातील मला कळत नाहीच काही.. पण या गाण्याला 'दयाघना' या गाण्यास जो राग आहे तो राग वापरलेला आहे असे मित्राने गाताना सांगितले होते..
काव्यरस

.... प्रेम कर!!

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 14/04/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या हरेक क्षणांवर .. प्रेम कर अस्तित्वाच्या घनघोर रणावर .. प्रेम कर नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या ओलाव्याने मोहरणार्‍या मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर कळ्या उमलती तू हसतना स्पर्श छेडती कोमल ताना देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर नको विचारू गतकालाला करेन वश मी त्या दैवाला माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर घाव झेलले जगण्यासाठी राखेमधुनी उठण्यासाठी हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर नुरतील तेथे काही व्यथा एक आगळी शांत अवस्था मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर अंत नसतो सृजनाला त्या विलयाच्याही बस्स रेघोट्या सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर - प्राजु

दूर दूर जातानां

लेखक निनाव यांनी गुरुवार, 14/04/2011 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? तुझे नि माझे गाणे गुणगुणती गावा च्या वाटा शपथ तुला ह्या वाटांची हिरव्या तु बघशील ना रे? दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? आसवे कळीस भ्रमर तसे मी पाहिन वाट तुझी रे क्षण क्षण हे जाता जाता हर क्षण मी तुज आठवीन ना रे? दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? -- अंतरातुनि वजा जाता राहिन तुझाच सखी गं डोळे मिटुनि बघशील दिसेन मीच जवळ तुला गं राहुन पाण्यात जशी ह्या मास्यास विझे न तहान प्रेमात तुझ्या तसा मी कसे होईल प्रेम कमी गं? -- दूर दूर जा