Skip to main content

कविता

खेळ काळाचा....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी गुरुवार, 05/05/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्ष्यात येईल... की... आपलं हे आयुष्य फक्त, तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं । जसं भूत आणि भविष्या मध्ये, हे वर्तमान घुसमटत असतं । ह्या तिघां मध्ये चालू असतो एक अजबच खेळ... वर्तमान धावत असतो जणू, भविष्यास त्या गाठण्या साठी । पण भूत अडवून धरतो त्यास..., भविष्यात त्याने ह्याला विसरूनये ह्यासाठी । पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ... वर्तमान जातो थकून, धावता-धावता त्या भाविष्या कडे । मग भूत येऊन म्हणतो त्यास..., थकला असशील तर..

किल्ली हरविली

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 05/05/2011 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
हरवली आहे एक किल्ली मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते ओरखडे न पाडता बाहेर काढणारी हरवली आहे एक किल्ली बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी हरवली आहे एक किल्ली अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून दयेची कोठारे उघडणारी हरवली आहे एक किल्ली अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी हरवली आहे एक किल्ली प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी

चोरून चोरून, हो ना?

लेखक उदय के'सागर यांनी बुधवार, 04/05/2011 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी हलकासाच पेपर उचलून मुद्दाम त्यावरच भाजी चिरून कधी उगाच रद्दी निट रचून नि रचेलेली रद्दी मुद्दाम पाडून        चोरून चोरून तू वाचतेस, हो ना? कधी धूळीवर, झाड़त असतांना कधी भांडयांवर, ते घासतांना काचेवर खिडक्या पुसतांना तर पानांवर पाणी घालतांना        चोरून चोरून तू लिहितेस, हो ना ? कधी ते "तेलकट रंग" भिंतींच्या अडून कधी त्या "पेंसिल" तिरक्या डोळ्यातुन कधी ती "पुस्तकं" अरशाच्या नजरेतून तर कधी "वह्या" फरशिच्या प्रतिबिम्बातुन        चोरून चोरून तू बघतेस, हो ना? बापरे!
काव्यरस

वाडा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/05/2011 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा
जुन्या जाणत्या भल्या थोरल्या गोष्टी सार्‍या सरल्या खोबणीत पांढरे झाले डोळे, जाणीवा जणू मेल्या ||१|| काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे कुठे पाहुनी कसे वदावे, वर्णन या मुखाने ||२|| डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली कुरकुरणार्‍या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३|| ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४|| ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगांचे उडते पोपडे कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६|| डुगडुगणार्‍या जिर्ण पायर्‍या जिना वर घेवू
काव्यरस

आले आले आमचे स्वामी बाबा आले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/05/2011 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
आले आले आमचे स्वामी बाबा आले
जय महाराष्ट्र! कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा! llपुण्याचे पेशवेll यांनी या प्रतिसादात (http://www.misalpav.com/node/17833#comment-310480) बाबा-महाराज लोकांच्या प्रवृत्तीवर काहीतरी जागृती होण्यासाठी काहीतरी लिहीण्याचे सांगितले होते. त्यांची आज्ञा आम्हास मान्य असल्याने खालील काव्य लिहीण्यात आले.

दोन मी

लेखक शरद यांनी शनिवार, 30/04/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. धनंजय यांची कविता वाचल्यानंतर कै. आरती प्रभू यांच्या एका जुन्या कवितेची आठवण झाली. दोन मी तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो तरिही मी कां चालतो ?

आला पहा कवी तो -

लेखक विदेश यांनी शनिवार, 30/04/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आला पहा कवी तो - आला पहा कवी तो - उलट्या दिशेस पळतो पाहून त्यास जो तो ! इकडून सिंह आला ; तिकडून बघ कवी तो सिंहासमोर जो तो जबड्यात शिरु पहातो ! का वाटते कवीचे भय फार सज्जनाला वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो !
काव्यरस

आयुश्याचं गणित...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 28/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या गणितात मी नेहमीच चुकलो... बघणं... तुला वजा केल्यावर स्वतासाठी सुद्धा नाही उरलो... हे गणित मांडताना एक महत्वाची गोष्टच विसरलो... साधे गोलाबेर्जेचे नियम लाऊन पुरता फसलो... शेवटी “तू” उत्तर याव म्हणून प्रत्येक त्रैराशिक मांडून पाहिलं... आणि उत्तर शोधता शोधता सुरवातच विसरलो... आता हे कळून चुकलय की आयुष्य गणिताएवढ सोप्प नसत... म्हणून शेवटी कितीही प्रयत्न करून हव ते उत्तर मिळतच अस नसत... ```पारिजात
काव्यरस

काल रात्री

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 27/04/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | ..........
काव्यरस