लेखकअभिजीत राजवाडेयांनी मंगळवार, 16/08/2011 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
खोबरे मृदु प्रेमाचे अन मिर्ची्चा घाव आहे.
आयुष्य तरी हे काय, एक मिसळपाव आहे.
सोडुनी गेली होती त्या जुन्या पिंपळाखाली
तिथेच भेटशील मजला हे मला ठाव आहे
धरतीचा कंप होऊनी ते डोंगर मिटुनी गेले
सांगावे लागले मजला, इथेच गाव आहे
ज्याने प्रदुषित केले त्यालाही तोय दिधले
गंगेकडेही कडेही माझ्या आई्चा स्वभाव आहे
खोटे पसरते आहे मजला अजुन आस आहे
अजुन माझ्या शरिराला माझे्च नाव आहे
लेखकप्रकाश१११यांनी सोमवार, 15/08/2011 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
झाडांनी दखल घेतलीय
बहरणारा ऋतू संपत आल्याची
कशी जाणीव होते झाडाना ..?
या बर्फाळ हवेची
श्वास गुदमरू लागल्याची
पाने पिवळी होऊ लागलीत
आता कधीपण सुरु होईल पानगळ
झाडांनी सर्व तयारी केलीय
काळीज घट्ट करून
पानाना निरोप देण्याची
निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे
कालच कितीतरी पाने गळून गेली
नि आज सकाळी
खच्चून सडा पडला पानांचा ...
काष्ट शिल्प
तशी झाडे ओकीबोकी ...!!
त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या
ढगाचा कल्लोळ आभाळात
आणि झाडे केविलवाणी .....
गळत्या पानाना कुशीत घेऊन
फक्त मुकी मुकी
झाडांनी मन घट्ट करून
तयारी केलीय कधीपासून
आपल्या पानाना निरोप देण्याची......!
तो ह्या प
लेखकगंगाधर मुटेयांनी शनिवार, 13/08/2011 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ललाटरेषा
धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली
तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली
ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?
घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली
गंगाधर मुटे
------------------------------------------
लेखकअभिजीत राजवाडेयांनी शुक्रवार, 12/08/2011 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजी म्हणजे मैत्रीण असते
सगळ्या घराची वीण असते,
मेणबत्तीला उभारण्यासाठीचे
खाली वितळवलेले मेण असते.
आजी ज्ञानाचे भांडार असते
अंधारात प्रकाशाचे दार असते,
कधी मायेची हळुवार फुंकर
कधी छडीचा कडवा वार असते.
आजी आमचे होकायंत्र आहे
तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे
विचारात नेहमी गुरफटतो आम्ही
ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे.
आजी म्हणजे दरारा असतो
आजी म्हणजे शहारा असतो
कुठलही पाऊल चुकत नाही
नजरेचा खडा पहारा असतो.
आजी म्हणजे दडपण आहे
आजी म्हणजे प्रेम पण आहे
पाहता क्षणी डोळ्यात भरणारे
घराचे भारदस्त घरपण आहे.
स्वराज्य घडविले शिवबाने
पण लढविले बाजीने आहे
जन्म आई-वडिलांनी दिला
संस्कार दिले आजीने आहे
घरटे साजिरे
लेखकअभिजीत राजवाडेयांनी गुरुवार, 11/08/2011 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
तुला पाहिले मी बाकि काही पाहिले ना,
आयुष्य पुष्प फक्त!, अन्य काही वाहिले ना.
उध्वस्त झाले गाव, मला काय त्याचे,
मी विचारले कि, माझे घर राहिले ना?
तुच्छ वाटे मजला दुःख कोणतेही,
फसवे वचन तुझे ते सांग साहिले ना.
जे पाहिले होते मी तुझ्या संगतीने,
ते विश्व चांदण्यांचे अद्याप पाहिले ना.
लेखकअभिजीत राजवाडेयांनी रविवार, 07/08/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या सुंदर वाटेवर ,मी धडपडतो आहे,
समईची येते याद, अंधार वाढतो आहे.
मोत्यांना मानेवरच्या, शेवटी पाहिले होते,
शुभ्रधवल तो मोती, नयनात दाटतो आहे.
तुटलेल्या त्या नात्यांना मी किड लावली होती,
इतुकी की माझ्या मी, मनात सडतो आहे.
माहित नाही मजला गाडलो किती मी आहे
घावात क्षणाच्या येथे, मी अजुन सापडतो आहे.
लेखकशुचियांनी शनिवार, 06/08/2011 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
"ऑन फायरींग अ सेल्स्मन" या कवितेतील मध्यवर्ती पत्र एक वयस्क असा विक्रेता आहे, ज्याच्या जोम आणि उत्साहाला वयापरत्वे ओहोटी लागली आहे.
रोज सकाळी तो लवकर उठतो, ट्रेन पकडायला धावतो, हसतमुख चेहेर्याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो. क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ऊर फुटेस्तोवर धावतो पण अनेकदा तर नव्याने एम बी ए झालेला पोरसवदा सहकारीत्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो.
त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक आहेत. तो येईयेइपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बयकोचे मूळातले कडू तोंड अधिकच वाकडे झालेले असते.
लेखकगंगाधर मुटेयांनी शुक्रवार, 05/08/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका
ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
स