खोबरे मृदु प्रेमाचे अन मिर्ची्चा घाव आहे.
आयुष्य तरी हे काय, एक मिसळपाव आहे.
सोडुनी गेली होती त्या जुन्या पिंपळाखाली
तिथेच भेटशील मजला हे मला ठाव आहे
धरतीचा कंप होऊनी ते डोंगर मिटुनी गेले
सांगावे लागले मजला, इथेच गाव आहे
ज्याने प्रदुषित केले त्यालाही तोय दिधले
गंगेकडेही कडेही माझ्या आई्चा स्वभाव आहे
खोटे पसरते आहे मजला अजुन आस आहे
अजुन माझ्या शरिराला माझे्च नाव आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1385
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
लयदार अन अर्थगर्भित ! छान
लयदार अन अर्थगर्भित !
छान लिहिता तुम्ही.
वाह छान आणि शब्दातीत लपलेला
वाह छान आणि शब्दातीत लपलेला अर्थ अधिक आवडला..
- पिंगू
मस्त .. १,३,५ हे शेर जास्त
मस्त ..
१,३,५ हे शेर जास्त आवडले..
व्वाह!! अप्रतिम.
व्वाह!! अप्रतिम.