Skip to main content

अंधार

अंधार

Published on 07/08/2011 - 22:28 प्रकाशित मुखपृष्ठ
स्वप्नांच्या सुंदर वाटेवर ,मी धडपडतो आहे, समईची येते याद, अंधार वाढतो आहे. मोत्यांना मानेवरच्या, शेवटी पाहिले होते, शुभ्रधवल तो मोती, नयनात दाटतो आहे. तुटलेल्या त्या नात्यांना मी किड लावली होती, इतुकी की माझ्या मी, मनात सडतो आहे. माहित नाही मजला गाडलो किती मी आहे घावात क्षणाच्या येथे, मी अजुन सापडतो आहे.
लेखनविषय:

याद्या 1343
प्रतिक्रिया 3