रानफुल
रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो,
तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा.
मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी,
बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली.
"तू आणि मी, आपण दोघं सारखेच !"
उमलतो पण गंधाला पारखे.
रानफुल सुखावलं ..
रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती,
माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार.
रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात ..
असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार.
जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल,
पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ?
-
आनंदयात्री
मिसळपाव
आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.