Skip to main content

नको रे कान्हा

नको रे कान्हा

Published on 23/01/2012 - 05:01 प्रकाशित मुखपृष्ठ
नको रे कान्हा नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी नको लगट दावू उगीचच खेटूनी || नार मी भोळी साधी सरळ हरणी रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी || गोरी माझी काया तू रे सावळा मनात दुजे काही चेहेरा भोळा नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी || श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा केशव मुरलीधर माधवा गोविंदा अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी || तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण तुझ्याविण जग सारे होई वैराण यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले तुझ्यासवे त्यात गेले चिंब न्हाऊनी || - पाभे

याद्या 1153
प्रतिक्रिया 5

पा>भे> ....यांना आंम्ही स-मस्त आशिक लोक्स त्यांच्या बहारदार,,,गीतं,लावण्या,गौळणींवर फिदा होऊन,,,दिल का डॉ..किताब बहाल करीत आहोत....कृपया उर्वरित पा.भे.रसिकांनी अनुमोदन द्यावे... :-)